कोटेबल कोट्‌स

विचारवंत
गुरुवार, 21 जून 2018

कोटेबल कोट्‌स
 

उत्तम आरोग्य आणि सकारात्मक मन हे सुखी आयुष्याचे गुपित आहे.
प्युबिलियस सायरस, ग्रीक कवी व लेखक

आपले आरोग्य उत्तम राखणे ही आपली जबाबदारी आहे. त्याशिवाय आपण आपले मन स्वच्छ आणि सशक्त ठेवू शकत नाही.
गौतम बुद्ध

निरोगी प्रकृती आपण खरेदी करू शकत नाही. ते आपले सर्वांत विश्‍वसनीय बचत खाते असते.
ॲने विल्सन शॉफ, लेखिका

सुदृढ आरोग्य राखण्यासाठी जे अन्न तुम्हाला आवडत नाही तेच खा, जी पेयं आवडत नाहीत तीच प्या, आणि जो व्यायाम तुम्ही करत नाहीत तोच करा.
मार्क ट्‌वेन

उत्तम प्रकृती राखण्यासाठी केलेला खर्च ही सर्वांत फायद्याची गुंतवणूक असते.
बराक ओबामा

सोने,चांदी ही खरी संपत्ती नसून, तुमचे उत्तम आरोग्य ही खरी संपत्ती आहे.
महात्मा गांधी

फोटो फीचर

संबंधित बातम्या