कोटेबल कोट्स
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018
कोटेबल कोट्स
कर्तृत्ववान माणसे कधीच नशिबाच्या आहारी जात नाहीत. नशिबापेक्षा त्यांचा प्रयत्नांवर विश्वास असतो, तेच आयुष्यात यशस्वी होतात.
धीरुभाई अंबानी
आपल्या कामात आनंद वाटणे हे समृद्धीचे लक्षण आहे.
पाल्लो पिकासो
दुसऱ्यावर विसंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. निर्णय बरोबर ठरला तर आनंद मिळतो आणि चुकला तर अनुभव मिळतो.
जोसेफ स्टॅलिन
आपण आपल्या आयुष्याच्या प्रेमात पडलो, की आपण कायम तरुण राहतो.
डौग हचसन, (अभिनेता)
प्रारंभ करणे हे आयुष्यात पुढे जाण्याचे रहस्य आहे.
मार्क ट्वेन
आपला मानवी जन्म खूप अल्पजीवी असतो; तेव्हा हाताशी असलेला प्रत्येक क्षण पुरेपूर जगावा.
वॉल्टर हेगन (गोल्फपटू)