कोटेबल कोट्स
गुरुवार, 3 जानेवारी 2019
कोटेबल कोट्स
सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजलात तर दुर्बल व्हाल आणि सामर्थ्यवान समजलात तर सामर्थ्यवान व्हाल.
- स्वामी विवेकानंद
भविष्यातील स्वप्नांमध्ये हरवू नका. भूतकाळात गुंतू नका, फक्त वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा. जीवनात आनंदी राहण्याचा हा एकमेव मार्ग आहे.
- गौतम बुद्ध
कोणीही बघत नसताना योग्य वागणे, म्हणजे गुणवत्ता होय!
- हेन्री फोर्ड
मी कधीही हरत नाही. एकतर मी जिंकतो किंवा शिकतो.
- नेल्सन मंडेला