कोटेबल कोट्‌स

विचारवंत
सोमवार, 25 मार्च 2019

कोटेबल कोट्‌स
 

उत्सुकता हा कंटाळ्यावरचा उपाय आहे, पण उत्सुकतेवर कोणताही उपाय नाही.
- डोरोथी पार्कर, कवयित्री


तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल, तर आधी सूर्यासारखे पेटून उठा. 
- डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम


तुमचा स्वतःवर आणि स्वतःच्या कौशल्यावर विश्‍वास असेल, तर कोणताही बदल स्वीकारणे सोपे जाते. 
- प्रियांका चोप्रा


माणूस कर्माने मोठा होतो, जन्माने नाही.
- आर्य चाणक्‍य


बदलाचे वारे वाहतात, तेव्हा काही लोक भिंती बांधतात आणि काही लोक पवनचक्‍क्‍या. 
- चिनी म्हण


हास्याशिवाय जो दिवस गेला, तो दिवस फुकटच गेला.
- ई. ई. कमिंग्ज, कवी


दुसऱ्यांनी केलेली टीका वैयक्तिक मानू नका, पण गांभीर्याने घ्या. टीकेमध्ये सत्य असेल, तर त्यातून धडा घ्या, नाहीतर दुर्लक्ष करा.
- हिलरी क्‍लिंटन


पुनर्भेटीच्या आनंदापुढे वियोगाचे दुःख फिके पडते. 
- चार्ल्स डिकन्स

संबंधित बातम्या