कोटेबल कोट्स
कोटेबल कोट्स
कधीकधी आपण बंद दाराकडे इतका वेळ बघत राहतो, की दुसरे दार उघडे आहे, हे आपल्या लक्षातच येत नाही.
- अलेक्झांडर ग्रॅहम बेल
शरीर निरोगी ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, त्याशिवाय आपले मन मजबूत आणि स्वच्छ राहणार नाही.
- गौतम बुद्ध
नकारात्मक लोकांपासून दूर राहा. त्यांना प्रत्येक उपायामध्ये समस्या दिसते.
- अल्बर्ट आइन्स्टाईन
स्त्रियांनीही अशक्य गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपयश आलेच, तर तेही इतरांसाठी आव्हान ठरूदे.
- अमेलिया एअरहार्ट,
अटलांटिक ओलांडणारी पहिली महिला वैमानिक
प्रेमातील अपेक्षाभंगाच्या तीव्र वेदनांवर मैत्री हे सर्वोत्तम औषध आहे.
- जेन ऑस्टिन
प्रत्येकाच्या आयुष्याचा अंत सारखाच होतो. माणूस कसा जगला आणि कसा मेला यावरून दोन व्यक्तींमधला फरक स्पष्ट होतो.
- अर्नेस्ट हेमिंग्वे
कोणताही मनुष्य एवढा अज्ञानी नसतो, की त्याच्याकडून काहीच शिकता येऊ नये.
- गॅलिलिओ गॅलिली