कोटेबल कोट्स
सोमवार, 8 एप्रिल 2019
कोटेबल कोट्स
दुसऱ्यांच्या वागण्यामुळे स्वतःची आत्मिक शांतता नष्ट होऊ देऊ नका.
- दलाई लामा
वेगाने बदलणाऱ्या जगात जोखीम स्वीकारायला घाबरणे, हाच मोठा धोका आहे.
- मार्क झुकेरबर्ग
आशावाद हा यशाकडे नेणारा विश्वास आहे. आशा आणि आत्मविश्वासाशिवाय काहीच घडू शकत नाही.
- हेलन केलर
काही जन्मजातच महान असतात, काही प्रयत्नांनी महान होतात आणि काहींवर महानता लादली जाते.
- विल्यम शेक्सपिअर
पैसा आकाशातून पडत नाही, तो पृथ्वीवरच कमवावा लागतो.
- मार्गारेट थॅचर
दिवसाचे सार्थक झाल्यास झोप चांगली लागते, त्याप्रमाणे आयुष्याचे सार्थक झाल्यास शांतपणे मृत्यू येतो.
- लिओनार्डो द व्हिन्सी
सत्य कधीतरीच शुद्ध असते आणि कधीच सोपे नसते.
- ऑस्कर वाइल्ड