कोटेबल कोट्स
सोमवार, 13 मे 2019
कोटेबल कोट्स
विहीर कोरडी पडते, तेव्हाच आपल्याला पाण्याचे मूल्य कळते.
- बेंजामिन फ्रॅंकलिन
प्रेमाशिवाय हजारो लोक जगू शकतात, पण पाण्याशिवाय कोणीच नाही.
- डब्ल्यू. एच. ऑडेन, कवी
जलचक्र आणि जीवनचक्र या दोन गोष्टी एकच आहेत, हे आपण विसरतो.
- जॅक यिव्ह कुस्तो, फ्रेंच एक्सप्लोरर
पाणी म्हणजे आयुष्य आणि स्वच्छ पाणी म्हणजे निरोगी आयुष्य.
- ऑड्री हेपबर्न, अभिनेत्री
विश्वामध्ये जीवसृष्टी नसलेले पाणी भरपूर आहे, पण पाण्याशिवाय जीवसृष्टी कुठेही नाही.
- सिल्व्हिया अर्ल, सागरी जीवशास्त्रज्ञ
पाणी हेच सर्व निसर्गाला चालना देणारे बळ आहे.
- लिओनार्डो द व्हिंसी
या धरतीवर जादू अस्तित्वात असेल, तर ती पाण्यामध्ये आहे.
- लॉरेन आयस्ले, अमेरिकन तत्त्वचिंतक