कोटेबल कोट्स
सोमवार, 1 जुलै 2019
कोटेबल कोट्स
इतरांना मदत करणे, हे आपल्या आयुष्याचे मुख्य ध्येय आहे. तुम्ही इतरांना मदत करू शकत नसाल, तर किमान दुखवू नका.
- दलाई लामा
उत्कृष्टता हा अपघात नसून अविरत चालणारी प्रक्रिया आहे.
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
एखादी गोष्ट व्यवस्थित व्हावी असे वाटत असेल, तर ती गोष्ट स्वतःच करा.
- नेपोलियन बोनापार्ट
तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने मार्गक्रमण करा. तुम्ही कल्पना केलेले आयुष्य जगा.
- ॲडम गिलख्रिस्ट
उठून उभे राहून बोलण्यासाठी धैर्य लागते आणि खाली बसून ऐकण्यासाठीही धैर्यच लागते.
- विन्स्टन चर्चिल
एखादी व्यक्ती विश्वासास पात्र आहे की नाही, हे जाणून घेण्याचा उत्तम पर्याय म्हणजे त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे.
- अर्नेस्ट हेमिंगवे
फुलाचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेनेच पसरतो. मात्र, मनुष्याचा चांगुलपणा चहूबाजूंनी पसरतो.
- आर्य चाणक्य