कोटेबल कोट्स
कोटेबल कोट्स
No agony, No pain,
Shall make me cry...
Soldier was I born,
Soldier shall I die...
- Indian Army
मी परत येणारच; एकतर तिरंगा फडकावून येईन, नाहीतर तिरंग्यामध्ये लपेटून येईन.
- कॅप्टन विक्रम बात्रा, परमवीर चक्र, कारगील युद्ध, १९९९
मला खात्री आहे, की ज्याच्याकडे साधे व्यवहारज्ञान आहे आणि जो मूर्ख नाही, असा कोणताही पुरुष किंवा स्त्री नेता होऊ शकते.
- फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ
स्वतःला सिद्ध करण्याआधी मृत्यू आला, तर मी मृत्यूवरही मात करेन.
- कॅप्टन मनोज कुमार पांड्ये, परमवीर चक्र, कारगील युद्ध, १९९९
जो आव्हान स्वीकारतो, तो जिंकतो. जो कष्ट करतो, तो जिंकतो. जो योजना आखतो, तो जिंकतो.
- भारतीय लष्कर
माझ्या देशाकरिता बलिदान देण्यासाठी माझ्याकडे एकच आयुष्य आहे, याचा मला खेद आहे.
- प्रेम रामचंदानी, फ्लाइंग ऑफिसर
देशभक्त त्याच्या कृतीमधून देशभक्ती दाखवतो.
- जनरल व्ही. के. सिंग
आम्हाला शोधण्यासाठी तुमच्याकडे कौशल्य हवे, आम्हाला पकडण्यासाठी तुमच्या हालचाली जलद हव्यात; पण आम्हाला हरविण्यासाठी..... नाही, तुम्हाला ते जमणारच नाही.
- भारतीय लष्कर
तुमच्यासाठी जे आयुष्यातील सर्वांत मोठे साहस आहे; ती आमची रोजचा दिनक्रम आहे.
- लेह लडाख महामार्गावरील लष्कराचा एक फलक
खूप खास मित्र आणि सर्वांत वाईट शत्रू हेच फक्त आम्हाला भेटायला येतात.
- भारतीय लष्कर
Quartered in snow, silent to remain. When the bugle calls, they shall rise and march again.
- Scroll of Honour, Siachen Base Camp