कोटेबल कोट्स
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019
कोटेबल कोट्स
जगातील सर्वांत सुंदर गोष्टी डोळ्यांना दिसत नाहीत किंवा स्पर्शाने जाणवत नाहीत, त्या अनुभवाव्या लागतात.
- हेलन केलर
अगदी कमी गोष्टींमध्ये आनंदात जगणे ही खरी संपत्ती आहे.
- प्लेटो, ग्रीक तत्वज्ञ
संयम राखणे हे कौशल्य आहे, चिकाटी असणे हे कौशल्य आहे आणि कठोर परिश्रम करणे हेसुद्धा कौशल्यच आहे.
- अभिनव बिंद्रा
जे तुम्हाला उत्तम जमते, ते तुम्ही करत असाल आणि आनंदीही असाल; तर तुम्ही आयुष्यामध्ये बरेच पुढे गेला आहात.
- लिओनार्डो डिकॅप्रिओ
अनिश्चित शंकेपेक्षा कोणतेही सत्य केव्हाही चांगले.
- सर ऑर्थर कॉनन डॉयल
मला नुसते सांगितले, तर मी विसरेन. मला शिकवले, तर माझ्या लक्षात राहील. मला सहभागी करून घेतले, तर मी शिकेन.
- बेंजामिन फ्रँकलिन
नवीन गोष्टींसाठी प्रयत्न केले नाहीत, तर तुम्ही मागे पडता.
- आशा भोसले