कोटेबल कोट्‌स

विचारवंत
सोमवार, 2 डिसेंबर 2019

कोटेबल कोट्‌स
 

संपूर्ण जगात तुम्ही किती छोटी जागा व्यापली आहे 
हे तुम्हाला भटकंती केल्यावरच समजते. 
- गुस्ताव्ह फ्लोबर्ट, फ्रेंच कादंबरीकार


प्रवास तुमच्या आयुष्यात प्रेम आणि ताकद परत आणतो.
- रुमी 


हे जग म्हणजे एक पुस्तक आहे; जे प्रवास करत नाहीत, ते या पुस्तकाचे फक्त एकच पान वाचतात. 
- सेंट ऑगस्टिन, तत्त्वज्ञ


जागेमधला बदल आणि प्रवास यांमुळे बुद्धीचे सामर्थ्य वाढते.
- सेनेका, रोमन तत्त्वज्ञ


तुम्ही पूर्वी कधीच गेला नाहीत अशा ठिकाणी वर्षातून एकदा तरी जायलाच हवे. 
- दलाई लामा 


वीस वर्षांनंतर आयुष्यात ज्या गोष्टी केल्या, त्यापेक्षा राहून गेलेल्या गोष्टींचे अधिक दुःख होते. म्हणूनच बाहेर पडा, नवीन गोष्टी करा, नवीन शोध घ्या, नवीन स्वप्ने बघा.
- मार्क ट्वेन


प्रवास करणारी व्यक्ती सुरुवातीला निःशब्द होते आणि नंतर कथाकार!
- इब्न बटुटा, मोरक्कन विद्वान

संबंधित बातम्या