कोटेबल कोट्‌स

विचारवंत
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

कोटेबल कोट्‌स
 

आपण कोण आहोत हे आपल्या क्षमतांवरून ठरत नाही, तर आपण घेतलेल्या निर्णयांवरून ठरते. 
- हॅरी पॉटर अँड चेंबर ऑफ सिक्रेट्स


एकतर करा किंवा करू नका. ‘प्रयत्न’ असे काही नसते.
- स्टार वॉर्स


प्रत्येक माणूस मरतो, पण प्रत्येक माणूस ‘जगत’ नाही. 
- ब्रेव्हहार्ट


हो, भूतकाळातल्या वाईट घटनांमुळे दुःख होते. पण तुम्ही त्यापासून पळून जाऊ शकता किंवा शिकू शकता.
- द लायन किंग


एखादी गोष्ट छान काम करते, याचा अर्थ तिच्यात सुधारणेला वाव नाही असे नाही.
- ब्लॅक पँथर


महान लोक जन्मजात महान नसतात, ते नंतर महान होतात. 
- द गॉडफादर


एकतर आयुष्य जगण्यात व्यग्र व्हा, नाहीतर मरण्यामध्ये तरी!
- शॉशँक रिदम्पशन


आपल्याकडे असलेल्या वेळाचे आपण काय करायचे हे आपणच ठरवायचे असते. 
- लॉर्ड ऑफ द रिंग्ज, फेलोशिप ऑफ द रिंग


कार्पे डिएम... दिवसाचे सोने करा. तुमचे आयुष्य असामान्यपणे जगा.
- डेड पोएट्स सोसायटी


आशा ही रणनीती नाही. 
- मिशन इम्पॉसिबल-फॉलआउट


तू एखादी गोष्ट करू शकत नाहीस, असे तुला लोक सांगतील पण त्यांचे ऐकू नकोस. तुझे स्वप्न तुलाच जपायचे आहे. जेव्हा लोकांना एखादी गोष्ट करता येत नाही, तेव्हा ते तुलाही ते करता येणार नाही असे सांगतील. तुला ती गोष्ट हवी असेल, तर तुला ती मिळवायचीच आहे. 
- द पर्स्युट ऑफ हॅपिनेस


एखाद्याची मर्जी किंवा लोभ हा सतत दिशा बदलणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीसारखा असतो.
- द फेव्हरेट

संबंधित बातम्या