कोटेबल कोट्‌स

विचारवंत
गुरुवार, 5 मार्च 2020

कोटेबल कोट्‌स
 

सत्य हे हजार पद्धतींनी सांगितले जाऊ शकते आणि प्रत्येक पद्धत बरोबरही असू शकते.
- स्वामी विवेकानंद


आपण काय करत आहोत हेच माहीत नसेल, तर त्यात मोठा धोका 
असतो.
- वॉरन बफे


एखादे काम सुरू करण्याआधी स्वतःला तीन प्रश्‍न विचारा- हे मी का करत आहे, यातून काय मिळणार आहे, मला यात यश मिळेल का? या प्रश्‍नांचा खोलवर विचार करून समाधानकारक उत्तरे मिळाली तरच पुढे जा.
- आर्य चाणक्य


तुमची जागा कोणीच घेऊ नये असे वाटत असेल, तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असणे आवश्‍यक आहे.
- कोको शनेल


जिंकण्यातून सामर्थ्य मिळत नाही, तुम्ही केलेल्या संघर्षातून मिळते. जेव्हा तुम्ही न थकता कष्टांना सामोरे जाता; तेच तर सामर्थ्य असते.
- अरनॉल्ड श्‍वारझेनेगर


पैसा हे एकमेव उत्तर नसते, पण त्यामुळे फरक पडतो.
- बराक ओबामा

संबंधित बातम्या