कोटेबल कोट्स
विचारवंत
मला जेव्हा जेव्हा वाईट वाटते किंवा माझ्या मनात नकारात्मक भावना असते, तेव्हा मी ती भावना स्वतःलाच प्रेरणा देण्यासाठी वापरते आणि अधिक काम करते.
- बियॉन्से
खंबीर, स्वतंत्र आणि सुशिक्षित स्त्री ही स्थैर्याचा आधारस्तंभ असते.
- अँजेलिना जोली
एखाद्या गोष्टीची भीती न वाटणे यापेक्षा त्या भीतीवर मात करणे हे महत्त्वाचे आहे.
- एमा वॉटसन
आयुष्य हे खूप उत्कंठावर्धक आहे... शेवटी तुमची सर्वात मोठी दुःखे तुमची ताकद ठरू शकतात.
- ड्र्यू बॅरीमोर
आयुष्यात कोणत्या गोष्टी केल्या यापेक्षा ज्या गोष्टी केल्या नाहीत, त्याचा पश्चाताप जास्त होतो. म्हणूनच प्रत्येक संधीचा स्वीकार करा.
- कॅमरन डियाझ
कुठलीही गोष्ट ‘impossible’ नाही, कारण त्या शब्दातच म्हटले आहे, ‘I’m possible.’
- ऑड्री हेपबर्न
तुम्हाला एवढेच करायचे आहे, की सकाळी उठून म्हणायचे, ‘आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात श्रेष्ठ दिवस असणार आहे.’
- ब्लेक लाइव्हली
आयुष्यात काहीही घडले, तरी लोकांशी चांगले वागा. हाच वारसा तुम्ही मागे ठेवणार आहात.
- टेलर स्विफ्ट