कोटेबल कोट्स

कोटेबल कोट्‌स
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

कोटेबल कोट्स

माझ्याकडे काही खास कलागुण नाहीत. मला फक्त खूप उत्सुकता वाटते.
- अल्बर्ट आइनस्टाईन

योग्य बोलण्यापेक्षा योग्य कृती करणे अधिक चांगले.
- बेंजामिन फ्रँकलिन

आपली जागा दुसऱ्या कोणी घेऊ नये असे वाटत असेल, तर त्यासाठी आधी आपण इतरांपेक्षा वेगळे असावे लागते.
- कोको शनेल

कुठल्याही गोष्टीबद्दलची ओढ, हेच दुःखाचे मूळ आहे.
- गौतम बुद्ध

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात बदल घडतात आणि हे बदलच आपल्याला मिळालेली दुसरी संधी असते.
- हॅरिसन फोर्ड

आयुष्यात न केलेल्या गोष्टींचा पश्चाताप जास्त होतो. म्हणूनच प्रत्येक संधीचा स्वीकार करावा. 
- कॅमरन डियाझ

मला जेव्हा जेव्हा वाईट वाटते किंवा माझ्या मनात नकारात्मक भावना असते, तेव्हा मी ती भावना स्वतःलाच प्रेरणा देण्यासाठी वापरते आणि अधिक काम करते. 
- बियॉन्से

 

संबंधित बातम्या