कोटेबल कोट्‌स

कोटेबल कोट्‌स
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

ब्लॉग

माझ्या मते, तुम्हाला इंद्रधनुष्य हवे असेल तर आधी पाऊस बघावाच लागेल.
- डॉली पार्टन 

पाऊस म्हणजे फक्त पाण्याचे थेंब नाहीत, तर ते आकाशाचे पृथ्वीसाठी असलेले प्रेम आहे.
- अज्ञात

स्वच्छ, निरभ्र दिवस असेल तर तुम्ही तुमचे शरीर मजबूत करू शकता; पण पावसाळी दिवस असेल तर तुम्ही तुमच्या विचारांमध्ये सुधारणा करू शकता.
- मेहमेत मुरात इदान

पावसाशिवाय जीवन नाही; पाऊस ही आपल्यावर असलेली कृपा आहे.
- अज्ञात

फक्त एका पावसात गवताचा रंग कित्येक पटींनी हिरवा होतो.
- हेन्री डेव्हिड थरो

वादळ कधी शमेल याची वाट बघणे म्हणजे आयुष्य नव्हे, पावसात बागडायला शिकणे म्हणजे आयुष्य.
- अज्ञात

सूर्यप्रकाश आनंद आणतो असे जो म्हणतो, तो कधीच पावसात नाचलेला नसतो.
- अज्ञात

संबंधित बातम्या