कोटेबल कोट्स

रोहित हरीप
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

कोटेबल कोट्स

तुमचा शत्रू चुका करत असताना त्यात व्यत्यय आणू नका.
- नेपोलियन

'आनंद' आणि 'दुःख' या दोन्ही गोष्टी आपण आधी निवडून ठेवतो आणि नंतर त्याचा अनुभव घेतो.
- खलिल जिब्रान

प्रमाणापेक्षा जास्त असलेली कुठलीही गोष्ट निसर्गाच्या विरोधातील आहे.
- हिप्पोक्रेट्‌स

आपल्याला पटत नसलेल्या विचारावर विचार करणे हे खऱ्या सुसंस्कृत मनाचे लक्षण आहे.
- ॲरिस्टॉटल

तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सगळ्यात आधी जागे व्हा.
- पॉल व्हॅलेरी (फ्रेंच कवी)

सगळ्यांवर प्रेम करावे, थोड्याच जणांवर विश्‍वास ठेवावा आणि कोणाचेच वाईट चिंतू नये.
- विल्यम शेक्‍सपिअर
 

संबंधित बातम्या