नावात काय आहे? 

प्रा. राधिका काकतकर इंगळे 
सोमवार, 27 जानेवारी 2020

रुआ आणि आरू
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.
 

कार्टूनवर बोलता बोलता रुआ आणि आरूचा संवाद दुसरीकडे वळला.. 

रुआ : आरू, हल्ली ना सगळे एकमेकांना Happy New Year म्हणत असतात. म्हणजे 1st January नंतर जे कोण Friends एकमेकांना भेटतायत ना, ते सगळे एकमेकांना Happy New Year म्हणतात. ग्रॅमा परवा Facetime वर म्हणाली, मला नाही बाई आवडत January ला नवीन वर्ष म्हणतात ते. आपलं नवीन वर्ष पाडव्याला. January हे काही नाव आहे का?... ‘चैत्र’ कसं छान वाटतं कानाला... आणि I was really curious. खरंच, January हे नाव कसं पडलं असेल? किंवा जुलै? किंवा ऑक्टोबर? Wassup Aaru, तू मला Months ची नावं कशी पडली हे सांगू शकशील? 

आरू :  Hey Ruaa! तुझा असा विश्वास आहे का, की जानेवारी हा वर्षाचा पहिला महिना कायमच होता? मी तुला थोडी वेगळी माहिती देते. मनोरंजक आणि थोडी विचित्रसुद्धा! प्राचीन रोममध्ये एक वेगळी कॅलेंडर सिस्टीम वापरली जायची. त्यांचे वर्ष मार्चमध्ये सुरू व्हायचे आणि फेब्रुवारीमध्ये संपायचे. जरी आपली modern calendar system प्राचीन रोमनांपेक्षा अगदी वेगळी असली, तरी त्यांनी आपल्याला खूप महत्त्वाचं काहीतरी दिलंय... महिन्यांची नावं! त्यांचं कॅलेंडर मार्चपासून सुरू व्हायचं So आपण तिथूनच सुरू करू या. एकेका महिन्याची माहिती मी तुला सांगते. 

मार्च - जुन्या आणि नवीन वर्षांच्या दरम्यान Festival च्या वेळी सर्व युद्ध थांबविण्याचा आग्रह प्राचीन रोमनांनी केला. प्राचीन रोममध्ये मार्च नवीन वर्षाचा पहिला महिना असल्यानं काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे, की War चा God असलेल्या Mars नावावर MARCH नावाचा महिना आहे. 

एप्रिल - काहीजण असा दावा करतात, की हे नाव ‘Apierre’पासून आले आहे, Latin मध्ये याचा अर्थ ‘उघडणे’ आणि वसंत ऋतूमध्ये फुले आपल्या पाकळ्या उघडतात. वसंत ऋतू तिकडं एप्रिलमध्ये येतो. So हे नाव... एप्रिल! कारण ते कळ्या उघडण्याचं प्रतिनिधित्व करतं. 

मे - ‘माइया’ देवीच्या नावावरून हे नाव ठेवलं गेलं. ही देवी सर्व वनस्पतींच्या वाढीची देवता असल्याचं रोमन Mythology चं मानणं होतं. 

जून - विवाहसोहळ्यासाठी जून नेहमीच लोकप्रिय महिना असतो. रोमन लोकांनी जूनो नावाच्या देवीच्या नावावरून जून महिन्याचं नामकरण केलं. विवाह आणि विवाहसोहळा यांची राणी म्हणून ‘जुनो’चं नाव घेतलं जायचं. 

जुलै - जुलैचं नाव ज्यूलियस सीझर नंतर इ.स.पू. ४४ मध्ये ठेवलं गेलं होतं. यापूर्वी जुलैला ‘क्विन्टिलिस’ म्हटलं जात असे. लॅटिन भाषेत त्याचा अर्थ Fifth असा होता. कारण तेव्हा जुलै पाचवा महिना होता. 

ऑगस्ट - ऑगस्टस सीझरवरून नंतर इ.स.पू ८ नंतर ऑगस्टचं नाव देण्यात आलं. पूर्वी ऑगस्टला ‘सेक्स्टिलिया’ म्हटलं जात असे. ज्याचा अर्थ लॅटिनमध्ये ‘सहावा’ असा होता.

रुआ : Hey Aaru, या इतक्या सर्व महत्त्वाच्या माहितीबद्दल Thanks. पण मला सांग आपण इंडियामध्ये राहतो, मग आपण या रोमन लोकांचं कॅलेंडर का follow करतो? 

आरू : Its actually very simple Ruaa. Suppose, उद्या तू मनोजकाकाकडं ऑस्ट्रेलियाला राहायला गेलास आणि तिकडं जर वेगळंच Calendar follow केलं जात असेल, तर केवढा मोठ्ठा प्रॉब्लेम होईल ना? So, जगभर Time and date ची Uniformity असावी यासाठी हे कॅलेंडर जगभर accept केलं गेलं आहे. 

रुआ : Wow! That is smart! माझ्या लक्षातच नाही आलं हे. म्हणून Time Zone चा Difference सोडला तर आपण आणि मनोजकाका एकाच Date वर असतो आणि आपण त्यांच्याशी Facetime करू शकतो. Anyway, मला आता आना हाक मारतीये, तिचे मॅथ्स प्रॉब्लेम्स Solve करायला मदत करायचीय मला. So, Till next time... उरलेल्या महिन्यांच्या नावांची माहिती ऐकायची आहे मला अजून... बाय आरू...

संबंधित बातम्या