नावात खूप काही आहे... 

प्रा. राधिका काकतकर इंगळे 
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

रुआ आणि आरू
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.

मित्रांबरोबर खेळून आल्यावर रुआन म्हणाला, 
Sorry Aaru, फ्रेंड्सनी हाक मारल्यामुळे information अर्धवट राहिली, महिन्यांच्या नावांची! मला next sixth months च्या नावांची गंमत सांग ना... 

आरू : Ruaa, Friendsनी हाक मारली, की खाली खेळायला जायलाच हवं... ग्राउंडवर खेळणं खूप इंपॉर्टंट असते, आपल्या healthसाठी. मी आहेच इथं हवी तेव्हा  इन्फर्मेशन द्यायला. 
So जरी आपण  सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर ९-१०-११-१२ महिने मानले, तरी हे रोमन कॅलेंडरप्रमाणं ७-८-९-१० होते. त्यांची नावं अशाप्रकारे त्यांना मिळाली.

सप्टेंबर - सप्टेंबरचं नाव सेपटेम या लॅटीन शब्दामधून सातवा या अर्थानी आलं आहे. 

ऑक्टोबर - ऑक्टोबरचं नाव ऑक्टो या लॅटीन शब्दामधून आठवा या अर्थानी आलं आहे. 

नोव्हेंबर - नोव्हेंबरचं नाव Novem या लॅटीन शब्दामधून नववा या अर्थानी आलं आहे. 

डिसेंबर - डिसेंबरचे नाव ‘दहा’साठी डेसेम या लॅटीन शब्दामधून आलं आहे. 

फेब्रुवारी - Around 690 BC च्या सुमारास, नुमा पॉम्पिलियसनं वर्षाच्या शेवटी एक संपूर्ण महिना celebration साठी ठेवला. Februs या celebration अर्थाच्या शब्दावरून हे नाव ठेवलं गेलं. अशाच प्रकारे फेब्रुवारीला त्याचं नाव मिळालं. 

जानेवारीनंतर, पॉम्पिलियसनं वर्षाच्या सुरुवातीस आणखी एक महिना जोडला आणि जानेवारीला त्याचं नाव जॉनस ठेवलं, जे Beginning आणि end चे देव आहेत. 1582 मध्ये पोप ग्रेगोरीनं calendar केलं, म्हणून बहुतेक पाश्चात्त्य देशांनी जानेवारी १ रोजी वर्षाची सुरुवात साजरी करण्यास सुरवात केली. हे नवीन कॅलेंडर Gregorian Calendar म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 

रुआ : Thank  you Aaru. मला इतकी छान माहिती दिलीस म्हणून. पण मग Grama म्हणाली, की चैत्र कसं छान वाटतं!... ते काय आहे? माझ्या class मध्ये एक मुलगी आहे Chaitra नावाची, तिचं नाव actually Month चं नाव आहे का? मला मराठी  Months व त्यांची नावं कशी पडली हे कोण सांगू शकेल? 

आरू : Of course me! मराठी Calendar मध्ये एकूण 12 महिने आहेत. हे महिने त्या वेळी जो कुठला ऋतू किंवा Season असतो त्याप्रमाणं केलेले आहेत. So listen आणि त्यावेळी कुठला season असतो ते बघ... 

 1. चैत्र : उन्हाळ्याची सुरुवात. चैत्र पालवी फुटते तेव्हा, म्हणजे नवीन पानं झाडांना येतात. 
 2. वैशाख : खूप कडक उन्हाळा. वैशाख वणवा म्हणजे Forest Fire मध्ये जेवढी गरम हवा असते तसा उन्हाळा. 
 3. ज्येष्ठ : कडक उन्हाळा. 
 4. आषाढ : आषाढालाच मराठीत आखाड असा दुसरा शब्द आहे. जेव्हा मनुष्य एखाद्यावर for no reason अधिकार गाजवू लागतो, त्या माणसाला jokingly आखाडसासरा म्हणतात! 
 5. श्रावण : श्रावणामध्ये पावसाच्या दोन सरींच्या दरम्यान चक्क ऊन पडतं. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. 
 6. भाद्रपद : यावेळी गणपती celebration असतं. 
 7. आश्विन : काही दिवस उन्हाळा, ज्याला आपण ऑक्टोबर heat असंही म्हणतो. 
 8. कार्तिक : थंडी पडायला सुरुवात होते. मस्त वातावरण असतं India मध्ये. 
 9. मार्गशीर्ष : खूप थंडी असते. काही ठिकाणी तर बर्फसुद्धा पडतो. 
 10. पौष : थंडी असते आणि हवा खूप pleasant असते. Gregorian कॅलेंडरचे new year आपण celebrate करतो. 
 11. माघ : थंडी आता हळूहळू कमी होते आणि schools मध्ये परीक्षेची तयारी सुरू होते. 
 12. फाल्गुन : आता मात्र उन्हाळा जाणवायला लागतो आणि शाळांना सुटीसुद्धा लागते. 

मराठी महिने 1 जानेवारीला चालू न होता, ते इंग्रजी महिन्यानुसार एप्रिलमध्ये येणाऱ्या गुढीपाडवा या सणापासून मराठी वर्ष चालू होते. That is a lot of information for today ना Ruaa!!! 

रुआ : Yes! you know what! मी आता ठरवलंय, की मी यावर एक मस्त प्रोजेक्ट करणार. मोहिनी Teacher एकदम खुश होतील. थँक्स आरू... and now I know... नावात खूप काही असतं! 
(Information source - Wikipedia)

संबंधित बातम्या