रडू‘बाई’? 

प्रा. राधिका काकतकर इंगळे 
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

रुआ आणि आरू
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.

रुआनचा आज मूड नव्हता. तो म्हणाला, ‘Hey आरू! मला आज जरा Sad वाटतंय... मला काय वाटतंय ते कळू शकेल अशा कोणाशी तरी बोलावंसं वाटतंय. काल आपल्या township मधली मायामांजर गेली. मला तिची आठवण येत होती. माझा चेहरा उतरलेला होता आज school बसमध्ये आणि थोडं रडूही येत होतं; तर ड्रायव्हरकाका लगेच म्हणाले, ‘रुआभाऊ, पोरीसारखं रडताय काय? तुम्ही बापे आहात, एकदम टणक राहायचं, काय? हे रडनं-बिडनं पोरींचं काम आहे अहो!’ आणि त्यांचे घाणेरडे Yellow दात दाखवत हसले. मग मला ना जरा जास्तच वाईट वाटलं आणि आणखी रडायला यायला लागलं. मी मग बसच्या बाहेर बघत बसलो आणि घर येईपर्यंत कोणाशीच बोललो नाही. Thank God आज आना absent होती, नाहीतर तिनी आणखी त्रास दिला असता. Wassup Aaru... काका असं का म्हणाले, की रडणं बिडणं मुलींचं काम असतं? मला रडू येतंय हे Wrong आहे का? मुलांनी का नाही रडायचं?’ 

आरू : Hey Ruaa! खरं सांगायचं तर रडणं म्हणजेच Crying.. हे नक्की काय आहे emotionally, ते मी एक कृत्रिम हुशारी असलेलं यंत्र असल्यामुळं तुला सांगू शकणार नाही. पण याबद्दल Scientifically जगभर काय म्हटलं जातंय हे मात्र मी तुला सांगू शकीन. त्यावरून तू ठरवू शकतोस, की तू रडतोयस हे बरोबर आहे का चुकीचं! तर, दुःख, राग, अपराधीपणाची भावना - Guilt, आनंद, हायसं वाटणं अशा अनेक कारणांनी रडू येऊ शकतं. प्रोलॅक्टिन - Prolactin नावाचं Hormone जे रडू येण्यासाठी कारणीभूत असतं, ते स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त असल्यानं बायकांना किंवा मुलींना, मुलांपेक्षा जास्त प्रमाणात रडू येतं. Adult स्त्रियांमध्ये या hormone चं प्रमाण पुरुषांपेक्षा 60 percent अधिक असतं. त्याचबरोबर पुरुषांच्या tear glands आकारानं मोठ्या असतात. या दोन्ही कारणांमुळं स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान प्रमाणात दुःख झालं, तरी स्त्रिया रडतात आणि निव्वळ अश्रू वाहात नसल्यानं पुरुष धीरगंभीर वाटतात. पण हे झालं शास्त्रीय म्हणजे Scientific कारण. मात्र पुरुष न रडण्याला सामाजिक म्हणजेच social reasons खूप आहेत. 

‘मर्द को दर्द नाही होता’, ‘रडायला तू काय बाई आहेस का?’ असं पुरुषांना त्यांच्या लहानपणापासून brainwash केलं जातं. ‘बायकांसारखं रडणं’ हे फार मोठ पाप मानलं जातं. काही पुरुषांना small reasons नी रडायला येतं. त्यांना बुळ्या म्हटलं जातं. ‘बायल्या’ म्हणून त्यांना चिडवलं जातं.  पुरुष रडत नाहीत म्हणजे ते strong असतात आणि बायका रडतात म्हणजे त्या soft आणि हळव्या असतात, असं काहीतरी गणित मांडलं जातं अनेकदा. या गणितात काहीही तथ्य नाही. बायका आणि पुरुष दोघंही nature नं तयार केलेले जीव आहेत. दोघांनाही शारीरिक किंवा मानसिक म्हणजेच physical and mental त्रास होऊ शकतो आणि दोघंही रडू शकतात. त्यांच्याकडं अनेक वेळा स्त्री किंवा पुरुष म्हणून न बघता माणूस म्हणून बघितलं पाहिजे. 

‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे लता मंगेशकर यांचं गाणं ऐकून चाचा नेहरू रडले होते, तसंच ‘पराधीन आहे जगती’ हे ‘गीत रामायणा’तलं गाणं ऐकून स्वातंत्र्यवीर सावरकरसुद्धा रडले होते असं म्हटलं जातं. अमेरिकेचे Ex-president Barack Obama सुद्धा अनेक वेळा त्यांच्या भाषणात Emotional होऊन रडायचे. हे सगळे खऱ्या अर्थानी राष्ट्रपुरुष होते. Now you decide... if boys can cry! 

रुआ : आरू, माझ्यासारखं feel करणारे अनेक लोक आहेत हे ऐकून मला solid confidence आलाय. मला मुलगा किंवा पुरुष व्हायच्या आधी एक चांगला आणि sensitive human being - माणूस व्हायला आवडेल. मला आता मायाची आठवण येऊन रडायला आलं, तर त्याची लाज वाटणार नाही. उलट ड्रायव्हरकाकांना मी समजावून सांगीन, की it is ok for boys to cry too!

संबंधित बातम्या