उड्यांचं वर्ष  

प्रा. राधिका काकतकर इंगळे 
सोमवार, 2 मार्च 2020

रुआ आणि आरू
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.

Wassup Aaru! आज ना पर्णिकाचा 12th birthday आहे. 29th February ला. पण मज्जा माहितीए का आरू? तिनी आत्तापर्यंत फक्त ३ वेळाच तिचा Birthday celebrate केलाय. ती माझ्या क्लासमध्ये Playgroup मध्ये असल्यापासून आहे. माझ्या वाढदिवसाला ती नेहमी आपल्या घरीपण येते. पण मी तिच्या Birthday party ला फक्त २ वेळा गेलोय. 4th and 8th birthday ला आणि आज जाईन तो 12th birthday. तिच्या आईनी तिला सांगितलंय, की तिचा वाढदिवस उड्या  मारत येतो, आणि म्हणून फक्त २ वेळा आलाय आत्तापर्यंत. मला कळत नाहीये, की 3 times birthday celebrate केला तरी पर्णिका १२ years ची कशी काय असू शकेल? Aaru Please explain... 

आरू : रुआ तुला आज Birthday पार्टीला जायचंय? Wow... मज्जा आहे तुझी! पण हा २९ फेब्रुवारीचा घोळ मी तुला छान explain करून सांगते. पर्णिकाची आई तिचा वाढदिवस उड्या मारत येतो, असं का म्हणाली हेसुद्धा तुला कळेल मग. 

फेब्रुवारी महिना २८ किंवा २९ दिवसांचा असतो. म्हणजे तीन वर्षं तो २८ दिवसांचा असतो, तर चौथ्या वर्षी या महिन्यात २९ दिवस असतात. हे सगळं घडतं ‘लीप’ वर्षामुळं. ग्रेगरियन कॅलेंडरनुसार फेब्रुवारी महिन्यात २९ तारीख येते तेव्हा ते लीप वर्ष असतं, पण दर चार वर्षांनी या प्रकारे लीप वर्ष का येतं आणि ज्या वर्षात २९ फेब्रुवारी तारीख येते त्याला लीप वर्ष का म्हणतात? दिवस, रात्र आणि Seasons या महत्त्वाच्या गोष्टी सूर्यामुळं control होतात. पृथ्वीची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा आणि seasons cycle एक असून, ते साधारण ३६५ दिवस ६ तासांचं आहे. So ज्युलियस सिझरनं इ. स. पूर्व ४५ मध्ये Gregorian calendar तयार करताना ३ वर्षं ३६५ दिवसांची केली आणि हे वर्ष वरचे ६ तास, ४ वर्षं एकत्रित करून, दर चौथ्या वर्षी ३६६ दिवसांचं calendar केलं. कारण As you know, 4 times 6 is 24 आणि एक दिवस २४ तासांचा असतो. Simple... Right? एक मात्र खरं, की दर चार वर्षांनी leap year येत नसतं, तर प्रत्येक वर्षी पृथ्वी सहा तासांनी, तर शंभर वर्षांत २४ दिवसांनी पुढं जाईल. त्यामुळं लीप वर्षाची पद्धत बंद केली, तर ५०० वर्षांनी डिसेंबर महिन्यात सध्या मे महिन्यात असतो तसा Summer season असेल. Amazing ना? 

रुआ : Amazing for sure! पण कुठलं वर्ष लीप इयर आहे हे कसं ठरवतात? 

आरू : Actually Ruaa, तू थोडंसं maths केलंस ना, तर तुलाही सहज कळेल. जे वर्ष ४ नी fully divisible असेल, ते वर्ष leap year असतं. उदाहरणार्थ हे वर्ष, म्हणजे २०२०! आता याला leap year का म्हणतात? तर या वर्षामुळं त्यातले सगळे वार दोन दिवसांनी पुढं जातात. उदा. म्हणजे २००२ आणि २००३ ही साधारण वर्षं असल्यानं २००२ मध्ये एक जानेवारी रोजी गुरुवार आला असेल, तर २००३ मध्ये तोच दिवस शुक्रवार असेल, one day difference. पण पुढचं वर्ष म्हणजे २००४ हे लीप वर्ष असल्यानं हा दिवस दोन वार पुढं गेल्यानं रविवार असेल. या प्रकारे लीप वर्षात दिवस दोन वार leap होत असल्यानं म्हणजे ‘उडी’ घेत असल्यानं याला leap year असा शब्द वापरला जातो. 

रुआ : Confusing but interesting... एक मात्र आहे, यामुळं पर्णिकाला दर वर्षी Birthday celebrate नाही करता येणार. But I guess म्हणूनच तिचे parents, every 4 years नंतर तिचा birthday फुल्ल थीम-बीम ठरवून करतात. Okie! चला... मला पण तयार व्हायचंय Birthday party साठी. आजची Theme आहे jumping jack !!! बाय आरू...

संबंधित बातम्या