किती गं बाई मी हुशार! 

प्रा. राधिका काकतकर इंगळे 
सोमवार, 9 मार्च 2020

रुआ आणि आरू
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.

त्या  दिवशी रुआ तणतणतच आला.. ‘OMG! हा अधिराजपण ना उगाच भांडत असतो आनाशी. आज आमच्या Science exhibition साठी selections होती आणि मी आणि अधिराजनी lemon juice च्या मदतीनं lights कसे लागतात याचा demo present केला. Full scientific explanation देऊन.. आणि आमचं selection झालं. अनाहिता नि Contemporary dance आणि त्याचे health साठी असणारे benefits यावर एक presentation दिलं. पण तिचं selection झालं नाही. Recess मध्ये फुल्ल राडा झाला मग. त्या दोघांचं मोठ्ठ भांडण झालं. अधिराज म्हणाला, की अनाहिता हुशार नाहीये. तिचा brain scientific नाहीये आणि म्हणून तिचं selection झालं नाही. अनाहिताचं म्हणणं होतं, की Teachers नेहमी क्लासमध्ये first 5 मध्ये येणाऱ्या मुलांनाच सिलेक्ट करतात, which is unfair. खरं तर आरू, मला आनाचं प्रेझेंटेशन आवडलं होतं. खूप creative डान्स करते आना. Centre for contemporary dance मध्ये class ला पण जाते ती. मग टीचरना आमचं प्रेझेंटेशन तिच्यापेक्षा जास्त relevant का वाटलं? म्हणजे त्याच तसं म्हणाल्या नंतर. Wassup Aaru, intelligence एकाच प्रकारचा असतो का?’ 

आरू : Hello रुआ! तुझ्या शाळेत किती interesting गोष्टी असतात. नेहमी मी तुला माहिती देत असते, पण आज पहिल्यांदा एक गोष्ट सांगते. Folk tale आहे ही. एकदा एक माकड, एक मासा, एक वाघ आणि एक कावळा यांना एकाच स्पर्धेत उतरवलेलं असतं. या स्पर्धेत त्यांची हुशारी किती आहे हे ठरणार असतं. स्पर्धा असते झाडावर चढण्याची. माकड, वाघ आणि कावळा हे सहज करू शकतात. मासा मात्र आयुष्यभर आपण बिनडोक असल्याचं मान्य करून बसतो. 

रुआ : आरू, पण माश्याला झाडावर चढताच येत नाही. त्याला पोहता येतं. त्याला या स्पर्धेत घेतलंच कसं? 

आरू : Exactly. प्रत्येकाची हुशारी ही वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते हे आपण मान्यच करत नाही. सगळ्यांना एकाच पद्धतीनं judge करतो आणि पटकन एखादा माणूस जो गणितात फार चांगला नाहीये, त्याला बिनडोक ठरवतो. Albert Einstein यांनी या कथेवरूनच म्हटलंय, ‘आपण जर माश्याला त्याच्या झाडावर चढण्याच्या कौशल्यावरून हुशार ठरवणार असू, तर त्याला आयुष्यभर आपण मूर्ख आहोत हे मान्य करून घ्यावं लागेल.’ 

आता मी तुला ९ वेगवेगळ्या प्रकारच्या हुशारींबद्दल म्हणजे Intelligence बद्दल सांगते - 

- हॉवर्ड गार्डनर या अमेरिकन डेव्हलपमेंटल सायकॉलॉजिस्टनं 1983 मध्ये नऊ प्रकारच्या बुद्धिमत्तेचं वर्णन केलं आहे. ते असं - 

  1. निसर्गवादी (Nature smart) : निसर्ग, फळं, फुलं, भाज्या, डोंगर किंवा शेतीविषयी ज्यांना विशेष कळतं त्यांच्यात या पद्धतीची हुशारी असते. 
  2. वाद्य (Sound smart) : वाद्य, ताल, लय ,सूर याची ज्यांना जाण असते त्यांना या पद्धतीची हुशारी असते. 
  3. लॉजिकल : Mathematical (Number smart) - हिशोब, आकडे, गणिताचं ज्ञान, profit - loss याबद्दल ज्यांना सहज कळतं त्यांना या पद्धतीची हुशारी असते. 
  4. अस्तित्वात्मक Existential (Life smart) : जीवनाचा अर्थ, यासारख्या मानवी existence बद्दल खोलवर प्रश्नांचा सामना करण्याची sensitivity आणि capacity ज्यांच्यात असते त्यांच्यात या प्रकारची हुशारी असते. 
  5. परस्पर (People Smart) : इतरांशी प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता चांगल्या पद्धतीनं ज्यांच्याकडे असते, त्यांना Interpersonal इंटलिजन्स असतो. 
  6. शारीरिक (Body smart) : विविध प्रकारच्या शारीरिक कौशल्यांचा, Physical skills चा उपयोग करण्याची क्षमता या पद्धतीच्या हुशार माणसांमध्ये आढळते.
  7. भाषिक (Language smart) : शब्दांमध्ये विचार करण्याची क्षमता आणि अवघड अर्थ Express करण्यासाठी भाषेचा वापर करण्याची क्षमता ज्यांच्याकडं असते, ते भाषिक हुशार असतात. उदा. साहित्यिक. 
  8. इंट्रा-पर्सनल (self smart) : स्वतःच्या विचारांची संपूर्ण ओळख आणि त्याप्रमाणं जगण्याचं भान ज्यांना असतं त्यांच्यात या पद्धतीची हुशारी असते. 
  9. स्थानिक (Picture smart) : ही हुशारी ज्यांच्यात असते, त्यांना 3D Images मध्ये विचार करता येतो. आकार आणि structure चं जास्त भान असतं. 

आता मला सांग... आना हुशार आहे का नाही? 

रुआ : आरू, आता तर मला पटलंय, की खरं तर क्लासमधले आम्ही सगळेच म्हणू शकणार आहोत, ‘किती गं बाई मी हुशार!’ कारण कोणाचं drawing चांगलंय, तर कोणाचं maths, कोणी छान guitar वाजवतं, तर कोणाला animals बद्दल खूप कळतं. आम्ही सगळेच आपापल्या style मध्ये हुशार आहोत आणि unique सुद्धा!

संबंधित बातम्या