आटपाट नगर होतं...

प्रा. राधिका काकतकर इंगळे
सोमवार, 13 जुलै 2020

रुआ आणि आरू
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.
प्रा. राधिका काकतकर इंगळे 

रुआ - हे आरू, तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू?
आरू - सांग ना... 
रुआ - सांग ना काय म्हणतेस? तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू?
आरू - अरे असा काय बोलतोयस?
रुआ - अरे असा काय बोलतोयस काय म्हणतीयेस? तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? 
आरू - ..... 
रुआ - काहीच का बोलत नाहीयेस? तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू?
आरू - व्वा रुआ... ही कापूस कोंड्याची गोष्ट खूपच interesting आहे... पण खरं तर गोष्टी interesting असतातच आणि माणसाला हसवतात, रडवतात, घाबरवतात आणि कोड्यातही पाडतात. 
रुआ - ...तरीही तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू? हा हा हा हा! सॉरी आरू, आज recreation class मध्ये आम्हाला storytelling चं session होतं आणि त्यात ही कापूस कोंड्याची गोष्ट ऐकली... सगळे खूप हसले आणि irritate पण झाले. क्लासमध्ये खूप धमाल केली आम्ही. पण मला प्रश्‍न पडलाय की गोष्टी सांगणं आणि ऐकणं कधीपासून सुरू झालं? Wassupaaru, मला सांग ना ही गोष्टीची गोष्ट...
आरू - गोष्टीची गोष्ट... खरंच खूप मज्जा येणारे मला तुला ही गोष्ट सांगायला. तर खूप खूप खूप खूप वर्षांपूर्वीपासून माणूस गोष्टीत रमत आलाय. गोष्ट म्हणजे एखादी काल्पनिक म्हणजे imaginary किंवा खरंच घडलेली घटना, दुसऱ्या व्यक्तीला रंजक किंवा interesting करून सांगणं. यामध्ये सांगणारा आणि ऐकणारा हे एक किंवा त्याहून अधिक व्यक्ती असू शकतात. खूप पूर्वी गुहांमध्ये आदिमानवानं काढलेल्या चित्रांपासून ते अगदी आत्ताच्या सिनेमांपर्यंत गोष्टी या humans ला खूप आवडतात. पद्धत जरी बदलली असली तरीही गोष्ट सांगायची आणि ऐकायची उत्सुकता तीच आहे.
Southern France मध्ये १५,००० आणि १३,००० B .C च्या मधे कधीतरी गुहांमध्ये काढलेली काही चित्रं, १९४० मध्ये काही फ्रेंच मुलांना खेळताना सापडली. ही चित्र म्हणजे काही प्राणी आणि एक माणूस यांच्यामधल्या  काही घटनांचं चित्रण, म्हणजे drawing होतं. या चित्रातून एका शिकारीच्या घटनेचं वर्णन केलं होतं. ही जगातली पहिली गोष्ट. २०० B .C मध्ये Aesop च्या गोष्टी लिहिल्या गेल्या आणि त्या आजही मनुष्यप्राण्याला जगण्यासाठी दिशा दाखवत आहेत. 
खरं तर Aesop ५०० B .C मध्ये जिवंत होता आणि या गोष्टी त्यानं त्यावेळी सांगितल्या. जवळ जवळ ४०० वर्षं या गोष्टी कुठल्याही पद्धतीचं printing किंवा कागद नसताना लोकांच्या लक्षात राहिल्या आणि कागदाचा शोध लागल्यावर त्या print केल्या गेल्या. ही असते गोष्टीची ताकद. या गोष्टींनाच इसापनीती म्हणून ओळखलं जातं. पंचतंत्र, जातक कथा यापण अशाच काही गोष्टी, वर्षानुवर्षं चालत आलेल्या. तोंडी सांगितलेल्या गोष्टी अतिशय impactful असतात. म्हणूनच हजारो वर्षं या गोष्टी across generations टिकून राहतात. 
लहानपण आणि गोष्टी यांचं तर एक solliddddd relation आहे. जगभर मुलं रात्री झोपताना गोष्ट ऐकल्याशिवाय झोपतच नाहीत. आई-बाबा, आजी-आजोबा, कधी वाचलेल्या तर काही कल्पनेतून आलेल्या गोष्टी पोरांना सांगतात. वाचता यायला लागलं की bedtime stories ची पुस्तकं वाचायला लागता तुम्ही, हो ना?
रुआ - Yep! हल्ली मी Kindle वर Grimms fairy Tales वाचतोय आरू. त्या गोष्टीतून खूप गोष्टी कळतात. Society मध्ये कसा वागावं, चांगलं काय आणि वाईट काय याबद्दलपण guideline मिळते. कारण त्या गोष्टींच्या शेवटी moral असतं आणि आपण काय शिकलो या गोष्टीतून हेपण समजतं.
You know what Aaru? मी आता ठरवलंय, मी पण एक छान गोष्ट लिहिणार आणि next recreation क्लासमध्ये वाचून दाखवणार!... Here goes....Once upon a time.....

संबंधित बातम्या