नकोत नुसत्या भिंती... 

प्रा. राधिका काकतकर इंगळे
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

रुआ आणि आरू
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.
प्रा. राधिका काकतकर इंगळे 

रुआ - Wassup Aaru! I swear, गेले 3 months मा आणि डॅडा घरी असल्यामुळं तुझ्याशी गप्पा मारायला वेळच मिळाला नाही. मा साठी work from home म्हणजे माझ्यासाठी डोक्याला shot असतो! त्यात या virus scare मुळं school ला पण सुटी दिली होती. मा ला मग तिच्या what’sapp ग्रुप्सवर ‘pandemic च्या काळात घरी मुलांना काय activities द्याव्या’ type खूप messages आले आणि तिनं मला फुल्ल टू कामाला  लावलं. डॅडाला तर उत्साहच आला होता साफसफाईचा. Fans, car, माळे सगळं काढलं होतं त्यानं स्वच्छ करायला आणि मी त्याचा assistant होतो. आज दोघंही कामाला गेले आहेत आणि मला हुश्श्श झालंय. Home ही काय concept आहे Aaru? माणसं हॉटेल्समध्ये पण राहतातच ना? मग घराला एवढं महत्त्व का?

आरू - हे रुआ! माझं डोकं चालवायची संधी दिलीस म्हणून खूप बरं वाटलं. House आणि home हे जरी English मध्ये २ शब्द असले, तरी मराठीमध्ये ‘घर’ हा या दोन्ही शब्दांसाठी एकच समानार्थी शब्द आहे. माणसाच्या लहानपणापासून घर ही संकल्पना म्हणजे concept अतिशय महत्त्वाची असते.  

रुआ - हो मला आठवतंय, काऊचं घर शेणाचं आणि चिऊचं घर मेणाचं ही गोष्ट किंवा एखाद्याचं घर उन्हात बांधू हं! ही मा नं काढलेली समजूत. 

आरू - correct! टोळी करून भटकणारा माणूस, Nomadic stage मधून जरा पुढं आल्यावर शेती करू लागला. घर बांधून एका ठिकाणी राहू लागला आणि एका जागी settle व्हायला लागला. घर किंवा Home ही rest आणि recreation साठी असलेली जागा आहे. माणसं कामाच्या जागेपासून किंवा मुलांच्या शाळेपासून जवळ असलेली, सोयीची जागा घर म्हणून निवडतात. घर स्वतःच्या पैशातून विकत घेतलेलं किंवा rent वर म्हणजे भाडेतत्त्वावर घेतलेलं असू शकतं. घर ही एक healthy concept आहे. जंगली किंवा पाळीव प्राणीसुद्धा स्वत:च्या घरात राहतात. गुहा, घरटं किंवा बिळं ही जंगली  प्राण्यांची घरं असतात. गोठा, तबेला किंवा खुराडं हीसुद्धा पाळीव प्राण्यांची घरंच असतात. माणूस किंवा प्राणी यांना घरात एक सुरक्षेचं म्हणजे security चं feeling असतं.

रुआ - हो खरंय! मी एखाद्या कॅम्पला गेलो असलो, तर मला मा आणि डॅडबरोबर घराचीपण आठवण येते. 

आरू - माणूस आणि घर यांचा emotional bond असतो. माणसाचं घराशी भावनिक नातं असतं. घर म्हणजे माणसाचं physical आणि emotional रक्षण करणारं firewall असतं. माणसं घरं बांधतात आणि घरंही माणसांना घडवतात. घरापर्यंत नेणारा रस्ता, त्याची वळणं, खाणाखुणा, एखादं आवडतं दुकान, बाग यांच्याबद्दलही मनात आपलेपणा असतो. जुनी घरं पाडली जातात तेव्हा खूप वाईट वाटतं. माणसाच्या मनामध्ये त्याच्या life मध्ये आलेल्या घरांच्या खूप आठवणी असतात. काही घरांच्या विशिष्ठ खोल्या, जिने, दारंखिडक्या, गच्च्या, व्हरांडे, अंगणं, त्या अंगणात सळसळणारी झाडं हे सगळं आपल्याला आवडत असतं आणि आठवतपण असतं. घराबद्दल अनेक कवींनी कविता केल्या आहेत, गाणी लिहिली आहेत आणि गोष्टीपण सांगितल्या आहेत.  एक खूप छान कविता सापडली आहे इंटरनेटवर, विमल लिमये यांची, ऐक!

घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती

त्या शब्दांना अर्थ असावा
नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी

त्या अर्थाला अर्थ असावा
नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी
नकोच नुसते पाणी

या घरट्यातुन पिल्लू उडावे
दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे
उंबरठ्यावर भक्ती

रुआ - wow आरू! किती छान आहे ही Poem. I feel so happy to be home! So मी आता जातो आणि माझी room आवरून ठेवतो म्हणजे घरालापण फ्रेश वाटेल! Bye....

संबंधित बातम्या