घ्या इथे विश्रांती... 

राधिका इंगळे काकतकर 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

रुआ आणि आरू
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.

रुआ अगदी कंटाळला होता.. ‘कधी संपणारे हा लॉकडाउन.. यार आरू, शाळा ऑनलाइन, क्लासेस ऑनलाइन.. अगदी मित्रमैत्रिणींना भेटणेसुद्धा ऑनलाइन... कंटाळा आलाय मला... तुझ्याबरोबर किती  बोलणार.. Sorry, don’t mind, पण तू शेवटी एक मशीन आहेस ना... तुला टाळी देता येत नाही, मिठी मारता येत नाही आणि तुझ्याबरोबर क्रिकेटपण खेळता येत नाही. आधीचे काही दिवस मज्जा वाटली, सुटी आहे याचा खूप आनंद झाला. खूप वेळ टीव्ही बघितला मी आणि खूप गेम्सपण खेळलो. पण मग बोअर व्हायला लागलं आणि शाळेची, फ्रेंड्सची, अगदी टीचर्सचीसुद्धा आठवण यायला लागली. ही सुटी खूप घाणेरडी गोष्ट आहे, असं जाणवायला लागलंय. WassupAaru, का असते ही सुटी?’ 

आरू - अरे हो हो.. चिडून काय उपयोग! माझा data असा सांगतोय की जगभर ही COVID सुटी लोकांना अज्जिबात आवडत नाहीये. कंटाळा आलाय या विश्रांतीचा सगळ्यांना. सुटी म्हणजे काय, ही काय concept आहे ते मी तुला सांगते.

रोजचा कामधंदा व ड्युटीज आणि बिझनेस यांच्या व्यापातून उसंत देणारा, श्रमपरिहार, leisure करणारा दिवस म्हणजे सुटी. सुटी म्हणजे इंग्लिशमध्ये हॉलिडे (Holiday).. हा शब्द मूळ प्राचीन अँग्लो-सॅक्सन Halig-daeg किंवा Halig-dag या दोन शब्दांपासून तयार झाला असून त्याचा अर्थ पवित्र कार्याला अर्पण केलेला दिवस किंवा religious festival असा आहे. Routine मधून विरंगुळा मिळण्यासाठी सुटीचा उपयोग असतो. ही Universal concept व practice प्राचीन काळापासून आजपर्यंत चालू आहे. हिब्रू संस्कृतीत सुटी (होलि डे) याचे दोन अर्थ दिलेले आहेत. एक, आनंददायी नृत्य व दोन, सणासाठी एकत्र जमण्याचे स्थळ. बायबलच्या जुन्या करारातील Genesis या पुस्तकात देवाने सहा दिवस उत्पत्ती करून सातव्या दिवशी विश्रांती घेतली, असे सांगितले आहे. 

याच पुस्तकात असे लिहिले आहे, की Human beings नी सुद्धा सहा दिवस काम केल्यावर सातव्या दिवशी विश्रांती घ्यावी. Genesis मध्ये पुढे म्हटले आहे, ‘देवाने सातवा दिवस (आठवड्या शेवटचा दिवस - रविवार) HOLY ठरविला कारण त्या दिवशी देवांनी सर्व कामकाजातून विश्रांती घेतली. ज्यू लोक हा सातवा दिवस शनिवार मानतात, ज्याला ते, Sabbath म्हणतात. ख्रिश्‍चन लोक रविवारी सुटी घेतात आणि मुसलमान लोक शुक्रवारी. सुटी हा शब्द ‘सूट’ या शब्दावरून आला असावा असे वाटते. भारतात राष्ट्रीय, राज्यस्तरीय व स्थानिक अशा तीन प्रकारच्या सुट्या असतात. स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) व प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) हे आता राष्ट्रीय सणच झाले आहेत. त्यांची सगळीकडे सुटी असते. भारत हे धर्मनिरपेक्ष (Secular) राष्ट्र असल्यामुळे येथे सर्व धर्मांतील प्रमुख सणांना सार्वजनिक सुटी दिलेली आढळते. 

भारतात, हिंदू धर्मातसुद्धा विश्रांतीला खूप  महत्त्व आहे. असे म्हणतात कि आषाढी एकादशीनंतर श्री विष्णू हे पुढचे चार महिने विश्रांती घेतात. त्या एकादशीला ‘देवशयनी एकादशी’च म्हणतात. म्हणजे देव आता यापुढे झोप घेणार आहेत. नवरात्रानंतर देवीसुद्धा विश्रांती घेते. तिच्यासाठी खास एक पलंग आणून, अनेक देवळांमध्ये तिला रीतसर त्यावर झोपवून विश्रांती दिली जाते. तुळजापूरला देवीची मंचकी निद्रा ही नवरात्रापूर्वी ५ दिवस आणि नवरात्रानंतर ५ दिवस असते. दसऱ्यानंतर कोजागिरी पोर्णिमेपर्यंत देवी विश्रांती घेते. भीमाशंकर येथेसुद्धा श्री शंकर विश्रांती घेत आहेत, अशी कथा आहे. Interesting आहे ना? 

गंमत या गोष्टीची आहे, की सगळ्या संस्कृतींमध्ये काम करून झाले, की सुटी घेतात आणि सुटीची मजा खूप काम केले की मगच येते. स्वतःच्या इच्छेनी घेतलेली सुटी सगळ्यांना आवडते, पण लादलेली किंवा forcefully दिलेली सुटी कोणालाच आवडत नाही. म्हणूनच तर हा लॉकडाउन कोणाला आवडत नाहीय. 

रुआ - So True Aaru! What an insight! आता ना माझा गिल्ट गेलाय, सुटीबद्दलचा. देवसुद्धा विश्रांती घेत असतील, तर मग चलो, मी पण लोळतो आता... हॅहॅहॅ! Goodnight आरू!!

संबंधित बातम्या