दाम करी काम... 

राधिका इंगळे काकतकर 
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

रुआ आणि आरू
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.

रुआ आणि आरूमध्ये त्या दिवशी अशाच गप्पा सुरू होत्या.. 

रुआ - मला ना कळतच नाही आरू, हल्ली सगळे सारखे Complain का करत असतात? मा सतत चिड चिड करतीये की बुटीक ३ महिने बंद आहे, सो पैसे नाहीयेत... डॅड म्हणतोय नोकरी आहे म्हणून ठीके, पण ज्यांचा व्यवसाय आहे त्यांचे अवघड आहे. या वर्षी Holiday वगैरे allow केला तरी अवघड आहे असे दोघांचे म्हणणे आहे. शाळा आणि classes online चालू आहेत म्हणून त्याची fee तर भरावीच लागणारे असे आनाची आई माँ कडे Complain करत होती. पैसे इतके Important असतात हे मला इतके दिवस वाटलेच नव्हते. खरेतर याचा कधी विचारच आला नव्हता माझ्या मनात. मला एखादी गोष्ट हवी असली, की ती  माँ कडे मागायची, माँ ATM मधून पैसे काढून किंवा Online shopping करून मला ती वस्तू देते. इतके सोप्पे होते ते. Why can we not live without money? हे पैसे वगैरे फंडे कधीपासून सुरू झाले? Wassupaaru या पैशांची काय history आहे? 

आरू - खरंय रुआ. तुम्हा माणसांच्या जगात पैशाला खूप महत्त्व आहे. अगदी मलासुद्धा विकतच घ्यावे लागलेय तुम्हाला. पैशांशिवाय काहीही करता येत नाही माणसाला. ‘पैसा बोलता है’ हे खरंय हल्लीच्या जगात. पण खूप पूर्वी असे नव्हते. नाण्यांचा शोध लागण्याआधी कितीतरी वर्षे शंख, शिंपले, कातडी, गायी, मीठ, धान्य, मणी, कापड आणि वचनचिठ्ठी (प्रॉमिसरी नोट) यांसारख्या चलनांचा वापर करून संस्कृती बहरल्या. संपूर्ण आफ्रिका, दक्षिण आशिया, पूर्व आशिया या ठिकाणी जवळजवळ चार हजार वर्षं ‘कवडी’ हे चलन वापरले जात होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत युगांडामध्ये कर भरण्यासाठी कवड्यांचा वापर केला जात होता. 

पैसा म्हणजे नाणी किंवा नोटा नव्हेत. वस्तूंची किंवा Services ची देवघेव करण्याच्या इराद्याने इतर वस्तूंची किंमत पद्धतशीररीत्या ठरवून त्यांचा स्वेच्छेने वापर करण्यासाठी जे काही वापरले जाते, ते म्हणजे पैसा. पैशामुळे लोकांना वेगवेगळ्या वस्तूंच्या - जसे सफरचंद, बूट आणि आणखी खूप काहीच्या Value ची सहजपणे तुलना करणे शक्य होते. तसेच पैशामुळे एका वस्तूच्या वा एखाद्या सेवेच्या बदल्यात दुसरी वस्तू घेता येते आणि संपत्तीचा सहज साठा करता येतो. 

रुआ - आरू पण मला कळत नाही, की सध्या पेपर notes ची किंमत हजार किंवा दोन हजार कशी असेल? आम्ही तर फटाफट notebooks ची पाने फाडतो. मग तेव्हा कोणीच म्हणत नाही, की नुकसान झाले. पण एकदा रंगपंचमीला माझ्या खिशात शंभराची नोट राहिली आणि रंगली तर माँ लगेच ओरडली होती. 

आरू - मान्य आहे मला हे लॉजिक. पण एक सांगू, पैशाची किंमत म्हणजे त्या कागदी नोटेची किंमत नसतेच. नोट १००० रुपयांची असली, तरी त्याचा कागद आणि १० रुपयांच्या नोटेचा कागद याची किंमत सारखीच असेल कदाचित; पण त्यावर छापलेला मजकूर त्याची किंमत ठरवतो.. आणि तो मजकूर आपल्या सरकारने ठरवलेला असतो आणि सर्वांनी मान्य केलेला असतो. खूप पूर्वी ज्या मेटलची जी किंमत असेल तेवढी त्या कॉइनची किंमत असायची. पण जगभर त्याची देवाण घेवाण करताना अडचणी जाणवायला लागल्या म्हणून मग आधी कागदी नोटा, मग बँका आणि आता ऑनलाइन व्यवहार म्हणजेच ट्रांझॅक्शन्स व्हायला लागली. 

काही लोक जुनी कॉइन्स जमवण्याचा छंद म्हणजेच hobby जोपासतात. Coins जितकी जुनी तितकी त्यांची value जास्त असते. म्हणजे ते कॉइन जरी कमी किमतीचे असले तरी खूप जुनी असल्यामुळे त्याची value जास्त  असते. 

रुआ - In short पैसे कमवल्याशिवाय ऑप्शन नाहीये.. आणि शिकल्याशिवाय नोकरी-धंदा करता येणार नाही. So गप्पा मारण्यापेक्षा online का होईना, पण शाळा attend करतो. Bye आरू.. आणि पुन्हा एकदा या Amazing माहितीसाठी Thank you !!!

संबंधित बातम्या