आधी पोटोबा ... 

राधिका इंगळे काकतकर 
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

रुआ आणि आरू   
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.

रुआन आणि आरूच्या गप्पा सुरू होत्या.. 

रुआ - Oh My God ! रोज नवीन प्रयोग आणि गिनीपिग कोण, तर मीच! 

आरू - काय रे मित्रा, काय झालं आज चिड चिड करायला? खरंतर जेवण झालं की तू एकदम मज्जेत असतोस रोज. पोट भरलेलं असलं की आनंदात असतोस तू, मग आज काय झालं? 

रुआ - गेले ३ महिने माँ आणि बाबा सतत कुकिंग करतायत. आज इटालियन तर उद्या मोगलाई, सकाळी Chinese तर संध्याकाळी Japanese... सारखे नवीन पदार्थ आणि त्याचे फोटो काढून facebook आणि Instagram वर टाकतायत. लक्ष्मीमावशी यायच्या तेव्हा इतकी व्हरायटी कधीच नसायची. माँ ला तर किचनमध्ये जायचाच कंटाळा यायचा. पण लॉकडाउनमध्ये दोघे फुल्ल Charge झाले आहेत गं! आरू, कुकिंग म्हणजे स्ट्रेस बस्टर आहे असं दोघांचं म्हणणं आहे. पण हे कुकिंग सुरू कधी झालं? आणि त्याच्या आधी Humans काय खायचे? WassupAaru.. How did cooking start? 

आरू - या सगळ्या प्रकाराला आग जबाबदार आहे रुआ! 

रुआ - आग? ती कशी काय? 

आरू - आगीचा शोध लागायच्या आधी आदिमानव, म्हणजेच तेव्हा ज्या फॉर्ममध्ये माणूस होता, तो कच्च्या भाज्या कंदमुळं आणि मांस खात असे. मग आगीचा शोध लागल्यावर आधी हे सगळे पदार्थ उकडून आणि मग भाजून खायला सुरुवात झाली. Homo Erectus या आदिमानवानं, सुमारे पाच लाख वर्षांपूर्वी स्वयंपाक करायला सुरुवात केली असे पुरावे उत्खननात मिळाले आहेत. होमो इरेक्टसनं सुमारे ४००,००० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या आगीच्या controlled use चा पुरावा आहे. ३ लाख वर्षांपूर्वीचे पुरातत्त्व पुरावे, पुरातन चुली, पृथ्वीवरील ओव्हन, जळलेल्या प्राण्यांची हाडं या स्वरूपात युरोप आणि मिड्ल ईस्टमध्ये आढळतात.  मानववंशशास्त्रज्ञांचा म्हणजे Anthropologists चा असा विचार आहे, की सुमारे अडीच (२.५) लाख वर्षांपूर्वी जेव्हा प्रथम चुली दिसू लागल्या तेव्हा मोठ्या प्रमाणात स्वयंपाकाची आग लागण्यास सुरुवात झाली. पाश्चिमात्य जगाच्या इतर जगाशी असलेल्या संवादामुळं स्वयंपाकाच्या इतिहासावर परिणाम झाला. बटाटे, टोमॅटो, मका, सोयाबीन, मिरपूड, मिरची, व्हॅनिला, भोपळा, अ‍ॅवोकॅडो, शेंगदाणे, पेकान, काजू, अननस, ब्लूबेरी, सूर्यफूल, चॉकलेट आणि स्क्वॅशचा इतर जगातील पाककलेवर खोल परिणाम झाला. नुसते पदार्थच नव्हे, तर त्यासाठी लागणारी भांडी, स्वयंपाक करायची जागा आणि स्वयंपाकाच्या विशेष पद्धती आणि चवी यांचाही शोध लागू लागला. 

रुआ - व्वा! मला सांग ना याबद्दलही. कारण मी हल्ली हे सारखं  ऐकतो ना! हेय इटालियन क्विझीन आहे, हेय चायनीज क्विझीन आहे वगैरे... 

आरू - उलथणे, कढई, कातण, कॉफी फिल्टर, किटली, किसणी, कुकर, गाळणे, झाकणी, झारा, डाव, तांब्याच्या बुडाचे भांडे, तवा, खोल/सपाट तवा, नॉनस्टिक तवा, परात, पळी, पातेले, पुरणयंत्र (श्रीखंडयंत्र), बोगणे, बुधला, तेला-तुपाची बुधली, भगुले, मसाल्याचा (मिसळणीचा) डबा, मोदकपात्र, रोवळी, लाटणे, सालकाढणी अशी अनेक भांडी जन्माला येऊ लागली आणि पुढे प्रचलित म्हणजे Establish झाली. अर्थात मेटलच्या भांड्यांचा शोध अजून लागला नव्हता आणि मातीच्या भांड्यांमध्येच स्वयंपाक केला जायचा. मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्याने अशी पोषक तत्त्वे मिळतात की ज्यामुळे प्रत्येक आजार आपल्यापासून दूर राहतात. ही गोष्ट आता आधुनिक विज्ञानानेदेखील मान्य केली आहे की मातीच्या भांड्यात जेवण केल्याने शरीरातील अनेक प्रकारचे आजार बरे होतात. Industrial revolution मुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन, export आणि अन्नाचे मानकीकरण झाले. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर फास्ट फूड आणि frozen फूड चा वापर वाढला आणि लवकरच इतर जगात पसरला. 

रुआ - पिझा, बर्गर्स मलाही आवडतात आरू, पण खरं सांगू का? आज कुकिंगची History ऐकली आणि मला माझ्या parents बद्दल proud feeling आलं! ५ लाख वर्षांपासून सुरू असलेली गोष्ट ते आजही रोज नवीन उत्साहानी करतायत. So मी फास्ट फूडपेक्षा त्यांनी केलेला वरणभात आजपासून मज्जेत खाईन!

संबंधित बातम्या