आली माझ्या घरी ही दिवाळी...

प्रा. राधिका काकतकर इंगळे 
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

रुआ आणि आरू 
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.
प्रा. राधिका काकतकर इंगळे 

रुआ- दमलो यार आरू. दिवाळी मध्ये मज्जा असली तरी फराळ खाऊन आणि पाहुण्यांशी बोलून दमायला होतं. मज्जा करूनही माणूस tired होऊ शकतो हे मला कळलंय आता. दर वर्षी हे पाच दिवस कसे  येतात आणि जातात हे कळतच नाही. दर वर्षी किल्ल्यावरून भांडणं होतात आणि मग त्याच Friends बरोबर दिवाळी party पण होते! एक गोष्ट मात्र मला दर वर्षी कळत नाही, आपण दिवाळी का साजरी करतो? नरकचतुर्दशी आणि पाडवा वगैरेचा relevance काय आहे? मला कोणीच सांगू शकत नव्हतं last year , पण या वर्षी तू आहेस. So मला सांग आता, काय असतो हा दिवाळीचा सण?

आरू -दिवाळीत मज्जा आली, हे तू एकदाही माझ्याशी बोलायला आला नाहीस ह्यावरून कळलंच मला. पण welcome बॅक रुआ. आणि तुला दिवाळीबद्दल माहिती हवीयना. हे बघ.. घे दिवाळी बद्दल माहिती-

दिवाळी किंवा दीपावली हा हिंदूंचा एक प्रसिद्ध सण. प्रत्येक दिवशी आनंदकारक घटना घडल्या असल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात. म्हणूनच दीपावली किंवा दिवाळी या नावाने हा सण ओळखला जातो. पावसाळा संपून थंडी किंवा शरद ऋतू सुरू होत असल्यामुळे या उत्सवाला धार्मिक व सामाजिक महत्त्व आले आहे. यावेळी नवे धान्य तयार झालेले असते, म्हणून हे ॲग्रीकल्चरल celebration आहे. दिवाळीच्या पाचही दिवसांचे importance  सांगणाऱ्‍या अनेक कथा पुराणांत आलेल्या आहेत. 

धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गोवत्सद्वादशी असते. याला वसुबारस असेही म्हणतात. या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करतात. हा दिवसही दिवाळीतलाच एक दिवस मानतात.

आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे नाव आहे. या दिवसाची गोष्ट पण मस्त आहे. यमराजाने आपल्या दूतांना ‘या दिवशी जो दीपदान करील, त्याला अपमृत्यू येणार नाही’, असे सांगितल्याची कथा आहे. म्हणून या दिवशी मंगलस्नान करून दीप लावतात. यमराजासाठी दक्षिणेकडे तोंड करून याच दिवशी दिवा लावायचा असतो. इतर वेळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावणे अशुभ समजतात.

आश्विन वद्य चतुर्दशीस नकरचतुर्दशी हे नाव आहे.या सणाची निराळीच कथा आहे.  या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला व त्याच्या बंदिवासात असलेल्या सोळा हजार स्त्रियांना बंधमुक्त केले. नरकासुराच्या रक्ताचा टिळा लावून कृष्ण सूर्योदयापूर्वी परत आला. त्या वेळी त्यास मंगलस्नान घालून ओवाळण्यात आले. याची स्मृती म्हणून सूर्योदयापूर्वी स्नान करून दिवे लावतात व आनंदोत्सव साजरा करतात. सत्यभामेने श्रीकृष्णाच्या साहाय्याने नरकासुराला मारले अशीही एक कथा आहे. कथा कुठलीही असली तरी या  

दिवशी सूर्योदय व्हायच्या आधी उठून, सुवासिक उटणे लावून अंघोळ करून फराळ करायची पद्धत आहे. 

आश्विन वद्य अमावस्येच्या रात्री लक्ष्मीपूजन असते. या दिवशी लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे व वैभवाचे म्हणजे prosperity चे प्रतीक आहे. योग्य मार्गाने धन कमावले तर मनुष्याचे कल्याण होते. यासाठी धनलक्ष्मीची या दिवशी पूजा करायची असते. या रात्रीच  फक्त  द्यूत म्हणजेच gambling  खेळावे,  असे सांगितले आहे. पैसे कधीही जाऊ शकतात, हे लक्षात येण्यासाठीच या खेळाची योजना असावी. लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते असं म्हणतात. जेथे स्वच्छता मांगल्य, प्रकाश आढळेल तेथे ती निवास करते अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्यांची रोषणाई करतात. 

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बालप्रतिपदा हे नाव आहे, म्हणजेच पाडवा. या दिवशी विष्णूने वामनावतार घेऊन बळिराजाला पाताळात लोटले, अशी कथा आहे. या दिवशी दीपदान करील त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत, असा वक वामनाने बळीराजाला दिला. या दिवशी बलिपूजा करण्याचीही पद्धत आहे. याला दिवाळी पाडवा म्हणतात. हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत आहे. गोवर्धनपूजा करण्याचीही प्रथा काही ठिकाणी आढळते. हा दिवाळीचा मुख्य दिवस मानतात.

कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीज. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे गेला तेव्हा तिने त्याला ओवाळले आणि आनंद व्यक्त केला. तेव्हापासून बहिणीने भावाला ओवाळण्याची चाल रूढ झाली.

भारताच्या निरनिराळ्या भागांत दिवाळीसंबंधी भिन्नभिन्न customs  दिसून येतात. वर्षात ओळीने पाच दिवस येणारा हा दीपोत्सव असतो. दिवाळीचा सण विशेष महत्त्वाचा असल्यामुळे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीत घरांवर आकाशदिवे लावतात.निरनिराळी फराळाचे पदार्थ करून देवांना त्यांचा नैवेद्य दाखवितात व नातेवाईक आणि मित्रमंडळींना फराळासाठी बोलावतात. 

रुआ- fantastic information आरू ! सगळे doubts totally gone !!! आता हॉलिडे homework मधे दिवाळी वर एक essay लिहून टाकतो

संबंधित बातम्या