मधाचे बोट

राधिका इंगळे
सोमवार, 7 डिसेंबर 2020

रुआ आणि आरू 
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.
प्रा. राधिका काकतकर इंगळे 

रुआ- Aaruuuu !!!absolutely fascinating !आज शंकर काकांनी beesचं honeycombपाडलं, C  बिल्डिंगच्या duct मध्ये लागलेलं. खूप bees उडाल्या आणि मग  काकांनी खाली पडलेलं honeycomb , त्याला ते पोळं म्हणत होते, ते सगळ्यांना तुकडे करून दिलं. मी बघत होतो त्या पोळ्याला आणि मला खूप भारी वाटलं. केवढं छान structure होतं आणि full of मध. #wassupaaru मला ह्या fascinating animals आणि त्यांच्या ह्या amazing घराबद्दल सांग ना!

आरू -वा रुआ, खूप छान प्रश्न विचारलास आज. छोट्या पण अतिशय कष्टकरी कीटक असतात ह्या मधमाश्या. त्यांच्या बद्दल सांगावं तेवढं कमीच आहे आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं तर खूपच आहे. तुला ह्या मधमाश्यांच्या काही भारी गोष्टी सांगते आज.

समूहाने राहणाऱ्या कीटकांपैकी एक मधमाशी. समूहाने राहणाऱ्या अशा प्राण्यांना eusocial असे म्हणण्याची पद्धत आहे. मराठीमध्ये याला “समूह सहजीवन वृत्ती” आणि इंग्लिश मध्ये social -cohabitation असे म्हणता येईल. समूहाने पिढ्यान्‌पिढ्या राहताना या गटाएवढे सामूहिक वर्तन genetic पातळीपर्यंत पोहोचले आहे. एका वसाहतीमध्ये एक राणी माशी, ऋतुमानाप्रमाणे थोडे नर आणि सतत बदलता राहणारा कामकरी माश्यांचा समूह अशी पोळ्याची रचना असते.

कामकरी माश्या (drones) राणीमाशीनी घातलेली अंडी मेणाने बनवलेल्या कोठड्यांमध्ये ठेवतात. कोठड्या बनविण्याचे कामही कामकरी माशाच करतात. एका कोठडीत एकच अंडे ठेवले जाते. कामकरी माश्या आणि राणी माशी fertilised eggsपासून  तर नर non-fertilised अंड्यांमधून निपजतात. कामकरी माश्यांच्या कामाच्या विभागणीचा विस्तृत अभ्यास झालेला आहे. नव्या कामकरी माश्या पोळे स्वच्छ ठेवण्याचे आणि अंड्यांतून बाहेर आलेल्या अळ्यांना खायला घालण्याचे काम करतात. पोळ्यामधील नव्या कोठड्या बांधण्यास मेण तयार करतात. कामकरी माश्यांचे वय जसे वाढेल तसे त्यांचे काम बदलत जाते. मेण बनविण्याचे काम जमेनासे झाल्यावर त्या मध गोळा करणे आणि pollen grains आणणे, पोळ्याचे रक्षण करणे अशी कामे करतात. मध आणि पराग गोळा करण्याचे काम त्या आयुष्याच्या शेवटपर्यंत करत राहतात.

अन्न गोळा करताना कामकरी माश्या  ठरावीक प्रकारच्या “Waggle dance”च्या साहाय्याने परस्परांना अन्न आणि पाणी कुठल्या दिशेला आणि किती लांब आहे हे सांगतात. अन्न गोळा करून आणलेल्या माश्यांकडून ते पोळ्यात नेण्यासाठी नव्याने कामाला लागलेल्या माश्यांसाठी वेगळ्या  

पद्धतीचे “थरथराट नृत्य” (Tremble dance) केला जातो.

मधमाश्या बाराही महिने समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. राणीमाशी, अनेक कामकरी माश्या आणि थोडे नर यांचा एकत्रित समूह म्हणून मधाचे पोळे अस्तित्वात असते. एकदा नव्या राणी माशीचे fertilisation झाले म्हणजे पोळ्यातील कामकरी माश्या आणि राणीमाशी नवे पोळे बांधायला बाहेर पडतात. नव्या पोळ्याची जागा कामकरी माश्यांनी आधीच शोधून ठेवलेली असते. नव्या जागेवर आल्या आल्या त्या नव्या पोळ्यासाठी मेणाच्या कोठड्या बांधायला घेतात. त्याच वेळी नव्या कामकरी माश्यांचे उत्पादन चालू होते. सामूहिक कीटकसृष्टीमध्ये असे वर्तन इतर जातीमध्ये आढळत नाही.

मधमाश्यांमधील एका वेगळ्या प्रकाराच्या नांगी नसलेल्या माश्या राणी माशी येण्याआधीच पोळे बांधून तयार ठेवतात. 

One more amazing fact रुआ, दहा सेल्सियसपेक्षा कमी तापमानास मधमाश्या उडणे थांबवतात आणि पोळ्याच्या मध्यवर्ती भागावर गोळा होतात. थंडीमध्ये एकत्र येण्याच्या या प्रकारामुळे आणि टप्प्याटप्प्याने केलेल्या हालचालींमुळे राणी माशी भोवतीचे तापमान २७ सेंटिग्रेडपर्यंत ठेवले जाते. पण या तापमानात राणी माशी अंडी घालू शकत नाही. पोळ्याचे तापमान 34 अंशापर्यंत वाढल्यानंतर राणी पुन्हा अंडी घालण्यास प्रारंभ करते. कामकरी माशा सतत पोळ्याच्या आतील भागाकडून बाहेरील भागाकडे फिरत राहिल्याने कोणत्याही माशीस असह्य थंडीस तोंड द्यावे लागत नाही.

Ruaa-wow! इतक्या छोट्या असलेल्या मधमाश्या इतक्या organised असतात हे केवढं भन्नाट आहे ना? मी तर साधं माझे cupboard पण नीट नाई ठेऊ शकत.. .जातो मी कपाट आवरायला आणि मग honey  schezwan noodles खायला!!

संबंधित बातम्या