मी माझ्या शेपटीने...

राधिका काकतकर -इंगळे
सोमवार, 14 डिसेंबर 2020

रुआ आणि आरू  
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.
प्रा. राधिका काकतकर इंगळे 

रुआ: hi आरू! आज ना नचिकेत आणि आदी मध्ये जोरदार भांडण झालं. आदी रडत रडत घरी गेला तर सगळे म्हणाले ‘बघा गेला शेपूट घालून’. शेपूट घालून म्हणजे काय ते कळलं नाही मला म्हणून तुला विचारायला आलो. काय आहे ह्याचा अर्थ #wassupaaru!

आरू - अरे तू पण observe  केलं असशील हे. Dogs घाबरले ना की शेपूट मागच्या दोन्ही पायांमध्ये घालून पळून जातात, त्यामुळे कोणी घाबरून पळून गेलं की त्याला ‘शेपूट घालून पळून जाणे’ असं म्हणतात. 

रुआ - हो! हे मी पण पाहिलंय. ए आरू ह्या शेपटीचा animalsला किती वेगवेगळ्या typeनी उपयोग होतो ना? काय आहे हा organ ? मला जरा सांग ना.  

आरू - ऐक ! शेपूट म्हणजे सगळ्या प्राण्यांचा एक महत्त्वाचा अवयव. हा अवयव प्राण्यांना सौंदर्यही प्राप्त करून देतो. प्राण्याच्या शरीराच्या मागील बाजूला शेपूट वाढलेली असते. शेपटीत हाडे, स्नायू,(muscles), तंत्रिका(tendrils) अशा महत्त्वाच्या organs असल्या तरी तिच्यात पोकळी नसते. शेपटीमध्ये स्नायू व तंत्रिका असल्याने तिची स्वतंत्रपणे हालचाल होऊ शकते. तिला संवेदना म्हणजे sensatioही असते. हाडामुळे तिला मजबुती व बळकटी येते. सामान्यतः प्राणी सर्वप्रथम पाण्यात evolve झाले. त्यामुळे शेपटीचा उपयोग पाण्यात पोहण्यासाठी होतो. शेपटीची दोन्ही बाजूंना होणारी  चपळ हालचाल ह्या मुळे प्राणी झपाटयाने पाणी कापत पुढे जातो. 

Vertebrates म्हणजेच spinal cord असलेल्या प्राण्यांना शेपूट असते. Amphioxus या प्राण्याचे शेपूट आखूड असते. हा एक प्रकारचा fish असतो. त्याच्या वरच्या व खालच्या बाजूवर पर असून ते टोकाकडे निमुळते झालेले असतात. ही अत्यंत primary typeची शेपूट असते. शार्क माशांची शेपटी fin सारखी असल्याने तिला tail fin म्हणतात. Tail finचे दोन भाग असतात. पाण्यात आणि जमिनीवर राहणाऱ्या बेडकासारख्या Amphibian  वर्गातील प्राण्यांच्या larvaना शेपूट असते. दिवसेंदिवस larvaची वाढ होत असताना त्याचे शेपूट आकाराने कमी होत जाते. Larvaची पूर्ण वाढ होऊन, त्याचे प्रौढ प्राण्यात रूपांतर झाल्यावर, त्या प्राण्याला शेपूट नसते.

Reptiles वर्गातील, साप, पाली, सुसर, कासव इ. प्राण्यांना शेपूट असते. अनेक जातींच्या पालींमध्ये संकटाचे वेळी शेपूट शरीरापासून तुटून पडते. त्यामुळे शत्रूचे लक्ष या वळवळणाऱ्या शेपटीकडे वेधले जाऊन पालीला सुरक्षित ठिकाणी पळून जाणे शक्य होते. सुसरी आपल्या शेपटीच्या तडाख्याने पाण्यातील लहान नावा उलटवून टाकू शकते. सरड्याचे शेपूट लांब असते. झाडाची फांदी पकडायला त्याला ती उपयोगी पडते.

Mammals प्राणिवर्गातील जमिनीवर अगर पाण्यात राहणाऱ्या सर्व प्राण्यांना शेपूट असते. सिंह, वाघ, हत्ती यांसारख्या प्राण्यांच्या शेपटीच्या टोकावर केसांचा गोंडा असतो तर घोडयाची शेपटी केसांचीच बनलेली असते. माकडाची शेपूट खूप लांब असते तर हरिणाची शेपूट आखूड असते. Mammalsना  शेपटीचा उपयोग शरीराला आधार देणे, शरीराचा तोल सांभाळणे, झाडाची फांदी पकडणे, पाण्यात पोहणे इत्यादींसाठी होतो. Extinct झालेले डायनोसॉर यांची व सध्या आढळणाऱ्या कांगारूंची शेपटी खांबासारखी जाड व मजबूत असते. कांगारूचे पुढील पाय आकाराने लहान असल्याने चालण्यासाठी अगर पळण्यासाठी उपयोगी पडत नाहीत, म्हणून पायांच्या जोडीला असणारे शेपूट तिसऱ्या पायासारखे उपयोगी पडते. या शेपटाच्या साह्याने कांगारू लांब लांब उड्या मारत धावते. जमिनीत बिळे करून राहणाऱ्या प्राण्यांची शेपूट खूप आखूड असते.

रुआ- Wow…such a tale of tails! मला खरंतर humans ला शेपटी नाही ह्याचे आत्ता खूप वाईट वाटतंय! Let me share this with friends now, bye.

संबंधित बातम्या