जिंगल ऑल द वे!

राधिका इंगळे 
सोमवार, 21 डिसेंबर 2020

रुआ आणि आरू  
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.
प्रा. राधिका काकतकर इंगळे 

रुआ -भांडायचे नाही असा ठरवले ना तरी आना भांडण काढतेच !खरंतर ख्रिसमस tree decorate  करताना हा विषय काढायची काही गरजच नव्हती तिला ... पण भांडण केल्याशिवाय आनाचा दिवस पुढेच सरकत नाही.

आरू -झालं का सुरु ?आज काय विषय होता?

रुआ - आनाचं म्हणणं  होतं की santa claus नसतो आणि तो रात्री येत नाही  गिफ्ट्स द्यायला. आई बाबाच आपण झोपलो की गिफ्ट्स सॉक्स मध्ये ठेवतात. किती खोटं बोलतीय ना आना? मला ह्या Santa Claus  बद्दल खरं खरं  सांग ना #wassupaaru !

Aaru- अरे नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख Christian  सण असतो. दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी Jesus Christ यांचा जन्मदिन म्हणून तो जगभर साजरा केला जातो. जवळपास इ.स. ३४५मध्ये, त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळचा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो. या दिवशी जगभरातले ख्रिश्चन धर्मीय एकमेकांना भेटवस्तू, Greeting cards देऊन परस्परांचे अभीष्टचिंतन करतात. रोषणाई करून घरं सजवलेली असतात. चॉकलेट, केक असे वेगवेगळे पदार्थ बनविले जातात. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. या नाताळच्याच मध्यरात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते. 

सांता क्लॉज (Santa Claus) हे western countries मध्ये आणि Christian  धर्मात आणि संस्कृतीत आढळणारे काल्पनिक म्हणजे imaginary पण लहान-थोरांची अत्यंत आवडती व्यक्तिरेखा आहे. सांता क्लॉजचे नाताळ सणाशी म्हणजेच Christmasशी अतूट नाते आहे. सांता क्लॉज मुला-मुलींना नाताळच्या आदल्या म्हणजे २४ डिसेंबरला मध्यरात्री खेळणी व इतर भेटवस्तू वाटतो असा समज जगभर आहे. बालमनावर सांता क्लॉजच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वाची छाप पडलेली आहे. पाश्चिमात्य देशात विशेषतः युरोपात, जगाच्या अन्य भागांमध्ये आणि भारतातही नाताळचा सण उत्साहाने साजरा केला जातो. महिनाभर आधीपासून या सणाची तयारी सुरू होते. सांता क्लॉज पांढरी फर लावलेला लाल रंगाचा Coat घालतो. त्याला लांब पांढरी शुभ्र दाढी असते. जराशा वयस्कर असणाऱ्या या व्यक्तीरेखेने काही वेळेला चष्मा लावलेला असतो. पायात काळे बूट कमरेला काळा पट्टा, हातात किंवा पाठीवर खाऊ आणि खेळणी यांनी भरलेली मोठी कापडी पिशवी असे याचे रूप असते. १९व्या शतकात अमेरिका आणि कॅनडा मध्ये सांता क्लॉजचे हे विशिष्ट रूप अधिक लोकप्रिय झाले.

लहान मुलांचा लाडका वाटणारा सांताक्लॉज ख्रिसमसच्या दिवशी सर्वांना भेटवस्तू का देतो असा प्रश्न अनेकांना लहान पणापासून पडलेला असतो? यामागे एक कथा सांगितली जाते. एका नगरात Nicholas नावाचा श्रीमंत माणूस राहत असे. हा माणूस पैशाने तसेच मनानेही श्रीमंत होता. त्याच्या हृदयात सगळ्यांकरीता दया आणि करुणा होती. तो गरिबांना मदत करायचा. लहान मुलांना Gift देऊन आनंद द्यायचा. मात्र हे सगळं करताना आपल्याला कोणी पाहू नये म्हणून निकोलस मुलांना रात्रीच्या वेळी मुलांना भेटवस्तू द्यायचा. ह्या Nicholasचे रूप म्हणजे Santa Claus.

आणखी एक गोष्ट आहे. तीही साधारण अशीच आहे. ‘सेंट निकोलस’, ‘नाताळ बाबा’ किंवा नुसताच ‘सांता् अशा विविध नावांनी सांता क्लॉज ओळखला जातो. Fourth centuryतील ग्रीक धर्मगुरू संत निकोलस हे भक्तांना भेटवस्तू देत असत. त्यांच्यापासूनच आधुनिक काळात सांता क्लॉज या संकल्पनेचा उगम झाला असावा, असे मानले जाते. ब्रिटिश आणि Dutch  संस्कृतींमध्ये उदयाला आलेली ‘सांता क्लॉज’ जी संकल्पनाही तेथूनच आली असावी. नाताळचा उगम प्राचीन Pagan Culture पर्यंत जाऊन पोहोचत असल्याने पगानच्या हिवाळी सणाशीही सांताचे नाते असल्याचे मानले जाते. संत निकोलस आणि नाताळ बाबा (Father Christmas) या दोन संकल्पनांचे एकीकरण होऊन त्यातून Santa Claus ही व्यक्तिरेखा प्रचारात आली आहे असे मानले जाते.

१९ व्या शतकात-सांताक्लॉजच्या व्यक्तिरेखेला विविध नव्या संकल्पना जोडल्या गेल्या. यामध्ये बर्फावरची घसरगाडी, ती गाडी ओढणारी Reindeer नावाची हरणं अशा गोष्टी जोडल्या गेल्या.पाश्चात्य जगातील लेखक, व्यंग्यचित्रकार यांनी या व्यक्तिरेखेला नवनव्या गोष्टी जोडल्या ज्या आजही लहान मुलांच्या भावविश्वात खूप महत्त्वाच्या ठरतात.

Ruaa-Oh so Ana was right! ठीके ह्याचा अर्थ आई बाबाच खरे Santa Claus असतात ना? चला तर मग, मला ह्या वर्षी काय हवाय ते त्यांनाच सांगतो! Bye!!

संबंधित बातम्या