ड्रामेबाज

राधिका इंगळे
सोमवार, 28 डिसेंबर 2020

रुआ आणि आरू 
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.
प्रा. राधिका काकतकर इंगळे 

रुआ - Christmas holidays  म्हणजे नुसती धमाल असते ना आरू. सगळीकडे मस्त थंडीचे वातावरण आणि Christmas tree चे decoration .. माँ म्हणते There is drama in the atmosphere. आणि मला वाटलं हा Drama कधीपासून सुरू असेल आपल्या country मध्ये?म्हणजे कोणी ठरवले की actors, writers, musicवाली ही जादू आपण present करूया. तुला माहिती असेलच. सांग ना मला ह्या dramebaaz लोकांबद्दल...

आरू- here it is. भारतीय रंगभूमीचा इतिहास बराच प्राचीन आहे. भारतात काही रंगभूमीपूर्व कला होत्या, असे प्राचीन भारतीय साहित्यांमधील संदर्भांवरून लक्षात येते. गोष्टी सांगण्याच्या कलेतून आख्यानकाव्यांचा म्हणजे भारूड किंवा कीर्तन यांचा जन्म झाला, आणि आख्यानकाव्यांमधून महाकाव्यांची निर्मिती झाली. ही महाकाव्ये oral traditionमधून  पिढ्यानपिढ्या preserve करण्यात आली. महाकाव्यांमधील गोष्टी  लोकांसमोर सादर करण्यात येत असत. त्यात वाचिक अभिनयासह संगीताचाही समावेश असे. वाचिक अभिनय आणि हावभावांची जोड मिळून छोटे नाट्यप्रसंग सादर होत असावेत. 

इ.स.पू. दोनशे ते इ.स.दोनशे या चारशे वर्षांच्या दरम्यान केव्हातरी संस्कृत नाट्यलेखनापासून ते नाट्यप्रयोगाची सगळी माहिती देणारा ‘नाट्यशास्त्र’ हा ग्रंथ रचला गेला. भरत हा नाट्यशास्त्राचा कर्ता समजला जातो. 

संस्कृत नाटकांमध्ये सर्वांत प्राचीन अशी नाटके अश्वघोष या नाटककाराची होती. ही नाटके बौद्ध धर्मातील शिकवणी संदर्भातील होती. सन १९१२मध्ये केरळात ताडपत्रांवर लिहिलेली भास या नाटककाराची तेरा नाटके सापडली. त्याने रचलेले ‘स्वप्नवासवदत्ता’ हे संस्कृत भाषेतील एक महत्त्वाचे नाटक मानले जाते. ‘कर्णभार’ आणि ‘ऊरुभंग’ या एकांकीका म्हणजे one act play  नाटकांमध्ये महाभारतातील villains चे glorification म्हणजे उदात्तीकरण असून ती नाटके करुणरसप्रधान आहेत. गुप्तकाळातल्या कालिदासाची अनेक नाटकं प्रसिद्ध आहेत. शूद्रकाने रचलेले ‘मृच्छकटिक’ हे एक लोकप्रिय संस्कृत नाटक होते. ही नाटके बहुधा संस्कृत भाषेत असली तरी त्यांतली काही पात्रे प्राकृत भाषेत बोलत असत. 

नाटक वेगवेगळ्या कालमर्यादेचे म्हणजेच durationचं असू शकतं. त्याप्रमाणे त्यांची categories केलेल्‍या असतात. उदाहरणार्थ - नाट्यछटा (याचा प्रयोगाचा कालावधी काही मिनिटे), एकांकिका (३० ते ४५ मिनिटे), दीर्घांक (सव्‍वा ते दीड तास), लघुनाटक/नाटिका (सव्‍वा ते दीड तास), नाटक (तीन ते सहा तास), दीर्घ नाटक (प्रयोग कालावधी ९ तास) आणि नाट्यत्रयी (तीन नाटकांना लागणारा कालावधी).

शिवाय नाटक कुठे सादर केलं जातंय  

त्यावरून केलेल्या categories सुद्धा असतात. म्हणजे पथनाट्य(street plays), परिसर रंगभूमी(forum theatre), रिंगण नाट्य(arena theatre), रंगमंच नाटक (proscenium theatre), निकट-मंच नाटक (intimate theatre) आणि देवळात, पटांगणात, जत्रेत, झाडाच्या पारावर वा तंबूत होणारी लोकनाट्ये (folk theatre).

प्रयोगाच्या दिवशी ठरलेल्या वेळेला माणूस नाटकघरात पोचतो. तिथे त्या दिवशी सादर होणाऱ्या तसेच पुढच्या काही दिवसांत सादर होणाऱ्या नाटकांची माहिती लावलेली असते. त्यानंतर प्रेक्षक तिकीट दाखवून प्रेक्षागृहात प्रवेश करतात. बंद पडद्यासमोर खुर्च्यांच्या अनेक रांगा ओळीने लावलेल्या दिसतात. प्रत्येकजण आपापल्या आसनावर जाऊन बसतो. आता, सादर होणाऱ्या नाटकाविषयी सांगितले जाऊ लागते. समोरचा पडदा हळूहळू उघडू लागतो. नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात होते.

रंगमंचावर हळूहळू प्रकाश येऊ लागतो आणि प्रेक्षक नाटकाच्या विश्वात प्रवेश करतो. कधी कधी मंचावर काही वस्तू मांडलेल्या असतात,  त्यावरुन त्याला हे नाटक कुठे घडते आहे याची कल्पना येऊ शकते. 

हळूहळू नाटक पुढे सरकते. प्रेक्षकाला नाटकातील व्यक्तिरेखांमधले नातेसंबंध लक्षात यायला लागतात. हळूहळू प्रसंगांची उकल होते.

नाटक संपते. पडदा पडतो. प्रेक्षागारातील दिवे उजळतात. नाटक बघायला आलेली माणसं टाळ्या वाजवतात. नाटकातले काही विचार, काही ठसे, काही भावना मात्र त्या प्रेक्षकाच्या मनात नंतर बराच काळ रेंगाळत राहतात. हा अनुभव केवळ एखाद्यालाच नाही तर अनेकांना येतो. शेकडो वर्षांपासून लक्षावधी-कोट्यवधी प्रेक्षक हा अनुभव घेत आलेत. अर्थात प्रत्येक वेळी हा अनुभव असाच असेल असे मात्र नाही; कधी ते जास्त हसले असतील तर कधी जास्त दुःखी झाले असतील. नाटकाचा हाच अनुभव अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी अनुभवता येऊ शकतो. कारण नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा जरी एकसारखा असला तरी त्याचा अनुभव मात्र प्रयोगागणिक वेगळा असतो, कारण नाटक ही प्रयोगकला आहे.

Ruaa- Wow आरू ,आपण काही वेळात नाटक बघून त्यातल्या dramaचे कौतुक करून बाहेर सुद्धा येतो, पण त्यातले लोक किती मेहनत करतात आणि गेली किती तरी वर्षे ते हेच करतायत हे आज कळले मला...Thank you

संबंधित बातम्या