खेळ मांडला... 

प्रा. राधिका काकतकर इंगळे
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

रुआ आणि आरू   : एंटरटेनमेंट
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.
प्रा. राधिका काकतकर इंगळे 

वैतागून रुआन म्हणाला... 
‘या नेटवर्कचा काय प्रॉब्लेम होतो हे कळतच नाही यार आरू! ग्रॅमाबरोबर इतक्या मस्त गप्पा चालल्या होत्या माझ्या Facetime  वर... ती मला तिच्या लहानपणी ते कसे खेळायचे हे सांगत होती आणि अचानक Network issue आला... मला कसं कळणार आता, पूर्वी लहान मुलं कोणकोणते खेळ खेळायचे? खरंच बोअर आहे Yaar! एकतर सतत घरात बसून बोअर झालंय, त्यात इंटरनेट! 

आरू - Chill! मी काही ग्रॅमा एवढी म्हातारी नाहीये, पण इंटरनेटवर खूप माहिती Available आहे जुन्या खेळांची, ती मी तुला नक्कीच देऊ शकते. बोल कुठल्या खेळांविषयी सांगत होती ग्रॅमा? 

रुआ - She was mentioning सूरपारंब्या, शिवाजी म्हणतो, डब्बा ऐस पैस, विटी दांडू आणि Something funny like  चोर चिट्ठी! म्हणाली की आमच्या लहानपणी खूप खेळायचो आम्ही. बाहेर खेळायचे आणि घरी खेळायचे वेगवेगळे खेळ असायचे. सांग ना आरू, यातल्या काही खेळांचे details दे! 

आरू - Ok! ऐक माहिती... 
सूरपारंब्या - या खेळासाठी जरा मोठ्या झाडांची आवश्यकता आहे. कारण त्यावर चढून, उड्या मारून हा खेळ खेळायचा असतो. झाडाच्या फांद्या पक्क्या हव्यात. २-३ पासून कितीही मुले हा खेळ खेळू शकतात. अंगणात एक गोलाकार रेखून त्यामधे एक काडी/काठी ठेवायची. एकावर राज्य व इतरांपैकी एकाने पायाखालून Circle मधली काठी लांब फेकायची. राज्य किंवा den  असलेल्या मुलाने ती काठी आणून वर्तुळात ठेवायची. तेवढ्या वेळात इतर मुलांनी पटापट झाडावर चढून जायचे किंवा वडासारख्या झाडाच्या पारंब्यांना लोंबकळून पाय जमिनीच्या वर घ्यायचे. कुणी खाली राहिल्यास त्याला राज्य घेतलेल्या मुलाने पकडायचे (आउट करायचे), किंवा २ मुलांनी झाडावरून उडी मारून काठी पुन्हा पायखालून फेकण्याचा प्रयत्न करायचा व राज्य असलेल्या मुलाने पटकन कुणाला तरी पकडायचे. जो आउट होईल त्याच्यावर राज्य. पुन्हा सर्वांनी पळत जाऊन झाडावर चढायचे. 

शिवाजी म्हणतो - पळापळीचे, उड्या मारण्याचे खेळ खेळून झाल्यावर खूप दमायला होते. अशा वेळी जेव्हा पळापळीचे खेळ खेळायचा कंटाळा येतो, तेव्हा एखादा बैठा खेळ खेळावासा वाटतो. त्यातलाच एक मजेशीर खेळ म्हणजे ‘शिवाजी म्हणतो..’ या खेळात जो खेळाडू शेवटचा सुटणार त्याच्यावर नियमाप्रमाणे राज्य येते. तो ‘शिवाजी’ होतो आणि इतरांना आज्ञा करतो. तो जे सांगणार ते इतर खेळाडूंना ऐकावे लागते. मग तो, ‘शिवाजी म्हणतो, हसा’, ‘डोक्याला हात लावा’, ‘हसता हसता मधेच थांबा’, ‘डोळे बंद करा’ अशी फर्माने सोडतो आणि इतर खेळाडू ती ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात. जो खेळाडू त्याच्याकडे दुर्लक्ष करेल किंवा चुकेल तो त्या खेळातून बाद होतो. या प्रकारे सगळे बाद होईपर्यंत हा खेळ सुरू राहतो. सगळे बाद झाल्यावर दुसरा कोणीतरी खेळाडू शिवाजी होतो आणि हा खेळ चालू राहतो. 

चोरचिट्ठी - या खेळात राजा, राणी, प्रधान, चोर, पोलिस असे पाच जण असतात आणि प्रत्येकाला Marks असतात. म्हणजे राजाला पन्नास, राणीला चाळीस, प्रधानाला तीस, पोलिसांना वीस आणि चोराला दहा गुण. या खेळाची सुरुवात करताना वहीचे एक कोरे पान घ्यायचे. त्या पानाच्या पाच चिठ्ठ्या करायच्या आणि पानाच्या प्रत्येक चिठ्ठीवर राजा, राणी, चोर, पोलिस, प्रधान अशी नावे लिहायची. सर्व मुलांनी गोल करून बसायचे आणि त्या गोलात कोणी एका मुलाने या सगळ्या चिठ्ठ्या एकत्र करून उडवायच्या. प्रत्येक मुलाने आपापली चिठ्ठी उचलायची. चिठ्ठी उघडून पाहिल्यावर त्या चिठ्ठीत जे नाव असेल ते कोणालाही सांगायचे नाही. ज्या मुलाच्या हाती ‘पोलिस’ असे लिहिलेली चिठ्ठी येईल, त्याने मात्र ते सगळ्यांसमोर जाहीर करायचे. नंतर पोलिस असलेल्या खेळाडूने ‘चोर’ कोण आहे हे ओळखायचे. 

चोर ओळखायला त्याला कोणीही मदत करायची नाही. प्रत्येक खेळाडूने इशारे न करता गुपचूप बसून राहायचे. जर त्या खेळाडूने चोराला बरोबर ओळखले, तर तो जिंकला आणि चुकीचा चोर ओळखला तर तो हरला. तो जिंकला तर त्याला चोर आणि स्वतःचे मिळून तीस गुण मिळतील आणि हरला तर शून्य आणि ते तीस गुण चोराला जातील. खेळाच्या शेवटी सगळ्यांचे गुण मोजले जातात, ज्याला सगळ्यात जास्त गुण असतील तो ‘चोरचिठ्ठी’ खेळाचा विजेता बनतो. 

रुआ - I don’t believe Gramma playing all this as a kid! पण I am sure तिला लहानपणी खूप मज्जा येत   असणार खेळायला. आजच बोलावतो आना, नचिकेत, पर्णिका आणि मानवला ‘चोर चिट्ठी’ खेळायला!!!

संबंधित बातम्या