दखल घेणे 

संदीप नूलकर, व्यावसायिक अनुवाद कंपनीचे संचालक 
गुरुवार, 3 मे 2018

शब्दाशब्दांत

काय सांगताय काय! 
मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट विकत घेतली की काही लोकांना "हे तू wholesale ध्ये मध्ये आणलेस की काय?' अशा प्रकारची विचारणा करताना मी ऐकले आहे. आपण जेव्हा असे म्हणतो तेव्हा आपल्याला "घाउक प्रमाणात' हा अर्थ अभिप्रेत असतो. पण खरेतर wholesale ध्ये मध्ये घाऊक प्रमाणात व कमी किमतीत असे दोन्हीही अर्थ आहेत. 

दुसरे म्हणजे, मराठीमध्ये बोलताना आपण चटकन एक इंग्रजी शब्द वापरून मोकळे होतो. परंतु कधी कधी इंग्रजी बोलताना पंचाईत होते आणि Looks like you bought this in wholesale असे वाक्‍य रचले जाते. 

नेहमीप्रमाणेच या वाक्‍यात काही चुकत असेल तर ते म्हणजे in या preposition म्हणजेच शब्दयोगी अव्ययाचा उपयोग. Wholesale च्या आधी in वापरणे चुकीचे आहे. Wholesale हे adverb म्हणजेच एक "क्रियाविशेषण' असल्याने त्याच्या व क्रियापदाच्यामध्ये in या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग चुकीचा आहे. खालील वाक्‍ये हे योग्य पर्याय आहेत. 

I bought these books wholesale या वाक्‍यात wholesale या शब्दाचा शब्दयोगी अव्यय म्हणून उपयोग केला गेला आहे. I bought these books at wholesale prices किंवा I bought these books in wholesale quantities या वाक्‍यांमध्ये wholesale या शब्दाचा विशेषण म्हणून उपयोग केला गेला आहे. 

क्वचित आपल्याला मातृभाषकांकडून in wholesale किंवा at wholesale असा उपयोग केलेला दिसू शकेल. पण ते व्याकरणाच्या दृष्टीने तितकेसे बरोबर नाही आणि बहुधा in wholesale quantities किंवा at wholesale prices हाच अर्थ त्यामध्ये अध्याहृत असतो. 

मजेचा भाग म्हणजे जर आपण I bought these books wholesale असे म्हटले तर त्यामध्ये "घाऊक प्रमाणात' व "कमी किमतीत' असे दोन्हीही अर्थ येऊन जातात. 

आहेत असेही काही शब्द! 
चेस्ट 
शब्द -
Chaste (adjective) 
उच्चार - चेस्ट 
व्युत्पत्ती - From Old French chaste morally pure, from Latin castus "clean, pure, morally pure", transferred sense of "sexually pure" is perhaps by influence of chastity, though chaste as a noun meaning "virgin person is recorded 
from the early 14 c. 
अर्थ - (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) without unnecessary ornamentation; simple orrestrained, शुद्ध. 
वापर - He spoke in chaste Hindi. 

आर्सनल 
शब्द -
Arsenal (noun) 
उच्चार - आर्सनल. 
व्युत्पत्ती - From Italian arzenale, from Arabic dar as-sina'ah "workshop," literally "house of manufacture," from dar "house" + sina'ah "art, craft, skill," from sana'a "he made.' 
अर्थ - A collection of weapons and military equipment, शस्त्र व लष्करी साधनसामुग्री किंवा ते ठेवण्याची जागा. 
वापर - With practically every nation aspiring to build its own nuclear arsenal, we are surely living in dangerous times. 

परदेशी पाहुणे 
टॅल्क 
The English language has borrowed the word 'talc' (टॅल्क) from Arabic. It means, talcum powder, टॅल्कम पावडर. 
वापर - She used talc every morning. 

वा! वा! वाक्‍प्रचार 
Full of beans म्हणजे (used informally) Lively, in high spirits, छान मूडमध्ये. 
वापर - One could see her laughing and chatting and generally full of beans at every party. 

Chat someone up म्हणजे (used informally) Engage someone in flirtatious conversation, एखाद्याशी फ्लर्ट करण्याच्या हेतूने बोलणे. 
वापर - She was only too happy to chat people up as long as they bought her a drink. 

गल्लत करू नका 
Putt (verb) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) म्हणजे Try to hit a golf ball into the hole by striking it gently so that it rolls across the green, गॉल्फचा चेंडू मारून मैदानावर त्यासाठी तयार केलेल्या भोकात घालण्याचा प्रयत्न करणे. 
Put (verb) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) म्हणजे To move to or place in a particular position, ठेवणे, मांडणे. 
Putt : The accuracy with which professional golfers putt the ball is simply amazing. 
Put : He put down his cup of tea before lighting a cigarette. 

ही कुठली भाषा? 
आपण जो Holiday हा शब्द वापरतो तो ब्रिटनमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीमधला आहे. त्याला अमेरिकेमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीमध्ये Vacation असे म्हणतात. 

जमली आमची जोडी 
Scant आणि regard या नामांचा एकत्र वापर केला जातो. 
उदा. The average Indian has such scant regard for cleanliness that a spotlessly clean country almost looks like an illusion. 
अर्थ - Scant regard म्हणजे very little concern, अत्यल्प कदर. 

Listen to हे क्रियापद आणि advice या नामाचा एकत्र वापर केला जातो. 
उदा. Listening to the advice of our elders can be a wise thing to do. 
अर्थ - Make mess म्हणजे दखल घेणे, विचारात घेऊन त्यावर कृती करणे. 

आजच्या ठळक बातम्या 
बातमी - CR7 responsible for Real win 
बातमीचा अर्थ - Real Madrid win thanks to Cristiano Ronaldo. 
स्पष्टीकरण - The headline is almost cryptic with some clues for people to understand what they are talking about. CR7 is how the famous footballer Cristiano Ronaldo is referred to by his fans. 'C' stands for Cristiano and 'R' stands for Ronaldo. Number 7 is his jersey number. As for the word 'Real', it is made to look like an adjective that qualifies the noun 'win' but in reality is the name of the club he represents called Real Madrid. The headline thus conveys the news that Cristiano Ronaldo performed well, thus helping his team Real Madrid win their match against their opponents. 

शब्द एक, अर्थ दोन 
Line (noun) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) Along, narrow mark or band, रेघ. 
उदा. He could draw a straight line very easily unlike most of his classmates. 

Line (noun) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) An area or branch of activity, क्षेत्र. 
उदा. No matter what your line of work, stress at work is a given. 

Abduction (noun) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) the movement of a limb or other part away from the midline of the body or from another part, हात अथवा पायाची शरीराच्या मध्यभागापासून दूरकडे होणारी हालचाल. 
उदा. The patient experienced pain in the joint only on abduction. 

Abduction (noun) (अनेक अर्थांपैकी एक अर्थ) the action of forcibly taking someone away against their will, अपहरण. 
उदा. The abduction of the businessman was the work of the land mafia.

संबंधित बातम्या