‘स्क्रीन’ टाइम

इरावती बारसोडे
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

मोबाइल आणि लॅपटॉपचा वापर आणि गरज दोन्हीही दिवसेंदिवस वाढत आहे. आता सणासुदीच्या काळात सेल्स आणि ‘ऑफर्स’ही सुरू होतील. त्या पार्श्‍वभूमीवर काही निवडक मोबाइल्स आणि लॅपटॉप्सविषयी...

सध्या कोरोनामुळे काम, नोकरी, शिक्षण आणि मनोरंजनही घरबसल्या होत आहे. आत्ताची तरुण पिढी टेक्नो सॅव्ही आहेच. पण जे टेक्नो सॅव्ही नव्हते, त्यांनाही कोरोनाने डिजिटल माध्यमांकडे वळण्यास भाग पाडले. अभ्यासासाठी, कामासाठी मोबाइल्स आणि लॅपटॉप्सची मागणी वाढली. आता दसरा, दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर या गॅजेट्सच्या किमतींवर भरभरून सवलतही मिळत आहे. मोबाइल्स आणि लॅपटॉप्सचे भरपूर ब्रँड्स आणि भरपूर मॉडेल्स उपलब्ध आहेत. मोबाइल्समध्ये सॅमसंग, रेडमी, ओप्पो, व्हिवो, ॲपल, नोकिया, पोको, इन्फिनिक्स, मोटोरोला, एलजी; तर लॅपटॉप्समध्ये एचपी, असुस, डेल, लिनोव्हो, एसर, सॅमसंग, हुवेई, झायोमी अशा अनेक ब्रँड्समध्ये असंख्य व्हरायटी बघायला मिळते आहे. 

या व इतर काही ब्रँड्सच्या मोबाइल आणि लॅपटॉप ॲक्सेसरीजमध्येही भरपूर पर्याय आहेत, उदा. पेनड्राइव्ह, कीबोर्ड, मेमरी कार्ड्स, हेडफोन्स, ब्ल्यूटुथ हेडफोन्स इ. घरबसल्या ऑनलाइन घेता येतील अशा मोबाइल आणि लॅपटॉप्सच्या काही मोजक्या मॉडेल्स हा आढावा या लेखात घेतला आहे. लेखामध्ये दिलेल्या किमतींमध्ये बदल होऊ शकतो.

मोबाइल फोन्स
बीबीके इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे व्हिवो, ओप्पो हे स्मार्ट फोन्स लाँच झाल्यापासून आपल्याकडे लोकप्रिय आहेत. उत्तम कॅमेरा क्वालिटी (फ्रंट कॅमेरासह), जास्त मेमरी आणि रास्त किंमत यामुळे ज्याच्या-त्याच्या हातात ओप्पो आणि व्हिवोचे स्मार्टफोन्स दिसू लागले. आजही १२-१३ हजार रुपयांमध्ये साधारण 3 GB RAM, 32 GB Internal Storage एवढी मेमरी असलेले चांगले फोन्स मिळू शकतात. तसेच मोबाइल फोन घेताना आधीचा मोबाइल एक्सचेंज करून काही हजार रुपयांची अतिरिक्त सवलतही मिळवता येते.
ओप्पोमध्ये A53, A5 2020, A5S, F17, F17 Pro, A12, , A31, A11K, A31, Reno4 Pro, Find X2 अशी अनेक मॉडेल्स नऊ ते ६५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यामध्ये घेऊ त्याप्रमाणे 3GB किंवा 4GB RAM आणि 32GB, 128GB इंटरर्नल स्टोरेजचे पर्याय आहेत. व्हिवोमध्ये आठ हजार रुपयांपासून ३५-४० हजार रुपयांपर्यंत V19, Y91i, Y20i, Y30, Y50, Y17, S1 Pro, X50 अशी अनेक मॉडेल्स आहेत. मोटोरोलाचा E7 Plus हा फोन नवीन लाँच होतो आहे. १२ हजार रुपयांच्या मूळ किमतीवर सूट मिळून ९.५-१० हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो. यामध्ये 4GB RAM, 64 GB Internal Storage आणि 512GB एक्सपांडेबल मेमरी आहे. ६.५ इंचाचा एचडी डिस्प्ले, 48MP + 2MP रिअर आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. 5000 mAh बॅटरी आणि Qualcomm Snapdragon 460 Processor आहे.

वनप्लस
वनप्लस मोबाइल्सची सुरुवातच ४० हजार रुपयांच्या पुढे होते. OnePlus 8 Onyx Black हा 12GB RAM आणि 256 Storage असलेला फोन ऑनलाइन ५० हजार रुपयांना मिळतो. या फोनमध्ये 48MP रिअर कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा, ६.५५ इंच 90Hz fluid display with 2400 x 1080 pixels resolution, नॅनो ड्युएल सिम, Android v10 operating system with 2.86GHz of clock speed with Qualcomm Snapdragon 865 powered by Kryo 585 CPU octa core processor, Adreno 650, 4300mAH लिथियम आयन बॅटरी आणि १ वर्षाची वॉरंटी अशी फिचर्स आहेत. वनप्लसचा सर्वात स्वस्त फोन Nord 5G सुमारे ३० हजार रुपयांना असून यामध्ये 12GB RAM आणि 256GB Storage आहे. 48MP+8MP+5MP+2MP quad रिअर कॅमेरा आणि 32MP+8MP फ्रंट ड्युएल कॅमेरा आहे. 6.44-inch 90Hz डिस्प्ले, OxygenOS based on Android 10 ऑपरेटिंग सिस्टीम, 4115mAH लिथियम आयन बॅटरी आणि १ वर्षाची वॉरंटी आहे.

रीअलमी
रीअलमीचेही काही नवीन रुपये मोबाइल्स लाँच होत आहेत. ११ ते १७ हजार अशी त्यांची किंमत आहे.
Realme Narzo 20 या मॉडेलमध्ये 4GB RAM आहे, तर internal storage साठी 64GB आणि 128GB असे दोन्ही पर्याय आहेत. 256 GB एक्सपांडेबल मेमरी आहे. ६.५२ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, 48MP + 8MP + 2MP रिअर आणि 8MP फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. 6000 mAh लिथियम आयन बॅटरीसह MediaTek Helio G85 प्रोसेसर आहे. व्हिक्टरी ब्ल्यू आणि ग्लोरी सिल्व्हर या दोन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध होईल.
याच्या पुढचे मॉडेल Realme Narzo 20 Pro यामध्ये 6GB RAM, 64 GB Storage आणि 8 GB RAM, 128 GB internal storage या दोन प्रकारांमध्ये ब्लॅक निंजा आणि व्हाइट नाइट असे दोन रंग उपलब्ध आहेत. चारही प्रकारच्या फोन्समध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. 48MP + 8MP + 2MP + 2MP Rear Camera आणि 16MP Front Camera आहे. 4500 mAh लिथियम आयन बॅटरी, MediaTek Helio G95 Processor आणि 65W Super Dart Charger असे फिचर्सही आहेत. फोनच्या मेमरीनुसार किंमत कमी-जास्त होईल.

सॅमसंग
सॅमसंगचे मोबाइल फोन्स इतर काही ब्रँड्सपेक्षा थोडे महाग असले, तरी क्वालिटी उत्तम असते. 2 GB RAM, 32 GB Internal Storage च्या सहा हजार रुपयांच्या मोबाइलपासून 8 GB RAM, 128 GB Internal Storage च्या ४० हजार रुपयांपर्यंत मोबाइलपर्यंत व्हरायटी आहे. 4 GB RAM, 64 GB Internal Storage साठी १० ते १५ हजार रुपयांमध्ये Samsung Galaxy A21, J6, A20s, M11 अशी अनेक मॉडेल्स आहेत. 128 GB internal storage हवे असेल तर मात्र १५ ते २५ हजार रुपयांच्या वर खर्च करावा लागेल. A71, A51 असे अनेक फोन्सचे पर्याय आहेत. चाळीस हजारांपर्यंत खर्च करण्याची तयारी असेल, तर स्टायलस पेन असलेला सॅमसंग गॅलेक्सी Note10 Lite हा फोनदेखील सुरेख आहे. 

लॅपटॉप्स
वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना लॅपटॉप्स लागतातच. पण आता शिक्षणही घरून सुरू झाल्यामुळे मुलांसाठीही लॅपटॉप खरेदी होऊ लागली आहे. शेवटी जेवढा मोठा स्क्रीन असेल, तेवढे डोळे कमी दमतील. लॅपटॉप्सच्याही अनेक कंपन्या आणि त्यांची अनेक मॉडेल्स आहेत. त्यातल्या काही मोजक्या लॅपटॉप्सविषयी इथे माहिती देत आहोत. लेखात दिलेल्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो.

ASUS VivoBook 14
किंमत : सुमारे ५५ हजार रुपये
प्रोसेसर : 10th Gen Intel Core i5-1035G1 Processor, 1.0 GHz (6MB Cache, up to 3.6 GHz, 4 Cores, 8 Threads)
मेमरी आणि स्टोरेज : 8GB (2x 4GB) DDR4 3200MHz Dual Channel RAM, upgradeable up to 12GB using 1x SO-DIMM Slot with | Storage: 1TB SATA 5400RPM 2.5-inch HDD + empty 1x M.2 Slot for SSD storage expansion.
डिस्प्ले : 14.0-inch (16:9) LED-backlit FHD (1920x1080) 60Hz Anti-Glare Panel with 45% NTSC
ऑपरेटिंग सिस्टीम : Pre-loaded Windows 10 Home with lifetime validity

Dell Inspiron 3493 14-inch HD 
किंमत : ४० ते ५० हजार रुपये
प्रोसेसर : 10th Generation Intel Core i3-1005G1 Processor (4MB Cache, up to 3.4 GHz)
मेमरी आणि स्टोरेज : 4 GB RAM Single Channel DDR4 2666 MHz आणि 1TB 5400 rpm 2.5"
डिस्प्ले : 14.0-inch HD (1366 x 768) Anti-Glare LED-Backlit WVA Display
ऑपरेटिंग सिस्टीम : Windows 10 Home Single Language | Microsoft Office Home and Student 2019 | McAfee Security 
Center 15 month subscription

HP 15s du2069TU 15.6-inch FHD 
किंमत : सुमारे ५० हजार रुपये
प्रोसेसर : 10th Gen Intel Core i3-1005G1 (1.2 GHz base frequency, up to 3.4 GHz with Intel Turbo Boost Technology, 4 MB L3 cache, 2 cores)
मेमरी आणि स्टोरेज : 4GB DDR4, expandable upto 16 GB आणि 1TB HDD, 5400 HDD
ऑपरेटिंग सिस्टीम आणि प्रीइनस्टॉल्ड सॉफ्टवेअर्स : Windows 10 Home | Microsoft Office Home & Student 2019 | In the box: Laptop with included battery, charger
डिस्प्ले : 15.6-Inch FHD SVA anti-glare micro-edge WLED-backlit, 220 nits, 45% NTSC (1920 x 1080)

Acer Aspire 3 
किंमत : सुमारे 44-45 हजार रुपये
प्रोसेसर : Intel Core i3-1005G1 processor with Max Turbo upto 3.40 Ghz
मेमरी आणि स्टोरेज : 4GB of DDR4 system memory, Upgradable up to 12 GB । 1 TB 2.5-inch 5400 RPM
डिस्प्ले : 15.6" Full HD 1920 x 1080, high-brightness Acer ComfyView LEDbacklit TFT LCD
ऑपरेटिंग सिस्टीम : Windows 10 Home 64-bit
वॉरंटी : One-year International Travelers Warranty (ITW) 

संबंधित बातम्या