ट्रेंडी ॲक्सेसरीज

सोनिया उपासनी
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

फॅशनचं जग इतकं परिवर्तनशील असतं, की आज ज्या गोष्टी ट्रेंडमध्ये आहेत, उद्या त्या असतीलच याची शाश्वती नसते... आणि ज्या गोष्टींची फॅशन निघून गेली, ती परत कधी नव्याने ट्रेंडमध्ये येईल का हेही सांगता येत नाही. फॅशन म्हणजे फक्त पेहरावातला नावीन्यपणा नाही, तर त्या पेहरावावर उठून दिसतील अशा ॲक्सेसरीजचाही त्यात समावेश असतो.
या ॲक्सेसरीजमध्ये विशेषकरून आर्टिफिशिअल ज्वेलरी (फॅशन ज्वेलरी), पर्सेस, हँडबॅग्स, फूटवेअर, केसांसाठी वापरल्या जाणाऱ्या ॲक्सेसरीज आणि एक्स्टेंशन, स्टायलिश घड्याळे इत्यादींचा समावेश आहे.

  • फॅशन ज्वेलरीमध्ये ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर अथवा गोल्ड ऑक्साइड ज्वेलरीचा समावेश होतो. थ्रेड ज्वेलरी, क्रिस्टल बिड्सपासून तयार केलेली, वेगवेगळ्या रंगांमधील कृत्रिम मोत्यांपासून तयार केलेली ज्वेलरी, टेराकोटा ज्वेलरी, कापडी पेंडंट्स या प्रकारांनासुद्धा विशेष मागणी आहे. 
  • पर्सेस आणि हँडबॅग्समध्ये सध्या कापडी नक्षीकाम केलेल्या स्लिंग बॅग्स, शबनम बॅग्स, बटवे खास ट्रेंडमध्ये आहेत. लेदर, कॅनव्हास, जूट, जीन्सच्या कापडाच्या हँडबॅग्स या सदाबहार फॅशनमध्ये असतात व सर्व वयोगटांच्या पसंतीच्या असतात. 
  • फूटवेअर्सही अनंत प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. घुंगरूजडीत कोल्हापुरी चप्पल, जयपूरच्या नक्षीकाम केलेल्या चप्पल, जोधपूरच्या मोजड्या सध्या पसंत केल्या जातात. 

या सगळ्या फॅशन ॲक्सेसरीजचा पेहरावानुसार व ओकेजननुसार योग्यरीत्या वापर केला, तर कुठल्याही प्रसंगी तुम्हाला ‘हेड टर्नर’ म्हणून मिरवता येईल.    
 

संबंधित बातम्या