टाइट्सला पर्यायी बॉटम वेअर्स

सोनिया उपासनी
सोमवार, 6 जुलै 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

गेल्या काही दिवसांत निसर्ग आणि हवामानाने आपला चेहरा बदलला आहे. या हवेतील परिणाम आपल्या त्वचेवरही होत असतात. ज्या प्रकारचे ‘स्किन हगिंग’ आऊटफिट्स आपण इतर वेळी घालतो, ते या ह्युमिड वेदरमध्ये सोसत नाहीत. दिवसभर बाहेर जाऊन काम करणाऱ्या व्यक्तींनी जर अशा हवामानात घट्ट कपडे घालून काम केले, तर विविध स्किन रॅशेस आणि इन्फेकशन्सला आमंत्रण मिळू शकते. 

प्रत्येक गोष्टीला पर्याय हा असतोच आणि बदलत्या ऋतुमानानुसार आपण आपल्या पेहरावातही थोडे बदल करू शकतो. घट्ट चुडीदार, लेगिंग, जीन्स, जेगिंग्स यावर जरी लाँग अथवा शॉर्ट टॉप्स उठून दिसत असले, तरी ‘चांगले दिसणे’ या एका फायद्यासाठी या दमट वातावरणात त्रास होत असताना दिवसभर अवघडलेल्या अवस्थेत बसणे यात शहाणपण नाही. फॅशन जगतात टाइट्सला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गरज आहे, ती फक्त आपल्या वॉर्डरोबमध्ये थोडेसे चेंजेस करण्याची.

चुडीदारला पर्याय म्हणून लूज लाँग पलाझो पँट मार्केटमध्ये आले. सर्वांनी या पेहरावाला पसंती देऊन स्वतःच्या गरजेनुसार या पलाझोचा घेर व उंची कमी करून इतर पर्सनल करेकशन्स केले आणि दैनंदिन वापरात आणले. आता मार्केटमध्ये या पलाझोचे आणि तत्सम अनेक पर्याय आणि साईज उपलब्ध आहेत. उदा. लाँग फ्लेअर्ड पलाझो, अँकल लेंथ स्ट्रेट फिट पलाझो, बेल बॉटम पलाझो. 

टाइट्सला इतर पर्याय म्हणून रफल्ड केप्रिज, सिगरेट पँट, पेन्सिल बॉटम बॅगीज, बेल बॉटम जेगीन्स आहेत. 

ट्रॅडिशनल ड्रेसेसखालीदेखील टाइट बॉटमच्या ऐवजी शरारा स्टाइल पँट, ए लाईन स्कर्ट, स्ट्रेट पलाझो, धोती यांची निवड करू शकता. 

घट्ट जीन्सला पर्याय म्हणून वाइड बॉटम जंपसुट्स, कॉटन स्ट्रेट पँट, रफल्ड केप्रिज, बेल बॉटम अँकल लेंथ ट्राउझर्सचा वापर करू शकता. 

धोती पँट हा असा एक पर्याय आहे, जो ट्रॅडिशनल, कॅज्युअल, कंटेम्पररी अशा सर्व पेहरावांखाली टीम अप केला, तर सर्व प्रकारच्या टॉप्सला एक आगळा वेगळा स्मार्ट लुक देतो.
फॅशन म्हणजे शेवटी काय हो; जो पेहराव परिधान केलाय, त्यात चांगले दिसणे आणि एक स्टायलिश व कम्फर्टेबल लुक कॅरी करणे, नाही का! 

संबंधित बातम्या