रेनी सीझन ॲक्सेसरीज

सोनिया उपासनी
मंगळवार, 21 जुलै 2020

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!

लवकरच श्रावण सुरू होईल. जरी सध्या बाहेर फिरायचे नसले, तरी रिमझिम बरसणाऱ्या श्रावणसरींमध्ये भटकंतीची मजाच काही वेगळी आहे. फॅशन ही फक्त कपडे आणि ॲक्सेसरीज पुरती मर्यादित न राहता पावसापासून बचाव करणाऱ्या वस्तूंमध्येपण दिसून येते. यात अनेक गोष्टींचा समावेश आहे. उदा. छत्र्या, रेनकोट, पावसाळी फुटवेअर, कॅप्स, बॅग्स आणि इतर बऱ्याच बारीकसारीक गोष्टी. 
यात सगळ्यात जास्त व्हरायटी आजकाल छत्र्यांमध्ये दिसून येते. प्रत्येकाच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार विविध डिझाइन्स, रंग आणि आकारांमध्ये या उपलब्ध आहेत.

  •      क्लासिक अंबरेला ही आकाराने मोठी आणि वादळी पावसापासून संरक्षण करणारी आहे. या छत्र्या रेनबो कलरमध्ये जास्त उपलब्ध आहेत.
  •      फोल्डिंग अंबरेला या रिमझिम पावसात वापरायला आरामदायक असतात आणि हातात अथवा बॅगमध्ये सहज कॅरी करता येतात. लहान मुलेसुद्धा याचा वापर स्वतंत्रपणे करू शकतात.
  •      बबल अंबरेला या गोलाकार मोठ्या आकाराच्या, शक्यतो ट्रान्सपरन्ट असतात आणि एकदम स्टायलिश दिसतात. या कॉलेज गोअर्सच्या विशेष आवडीच्या!
  •      ऑटोमॅटिक थ्री फोल्ड अंबरेला अगदी छोट्या बॅगमध्येसुद्धा घेऊन जाता येण्यासारख्या आणि एका बटणाच्या दाबावर उघड-बंद होणाऱ्या असतात. वर्किंग लेडीजच्या विशेष पसंतीच्या असतात.
  •      हेडबँड अंबरेला या डोक्यावर इलॅस्टिक बँडच्या साहाय्याने फिट बसतात. आकाराला छोट्या, पण सायकल अथवा स्कूटर चालवताना अत्यंत सोयीच्या असतात.
  •      रेनकोटमध्येसुद्धा प्रत्येकाला गरजेनुसार अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. पाँचो स्टाइल रेनकोट, अँकल लेंथ कोट स्टाइल, नी लेंथ लाँग रेनजॅकेट, वेस्ट लेंथ जॅकेट आणि पँट, स्कर्ट आणि जॅकेट, फ्रॉक स्टाईल रेन वेअर इ.
  •      फुटवेअरमध्ये लाँग गमबुट्स, फ्लोटर्स, ट्रान्सपरंट बॅलेरिनाज, सँडल्स इ. उपलब्ध आहेत. आपल्या पेहरावला सूट होईल असा बरोबर फुटवेअर निवडता येतो. 
  •      विविध रंगी कॅप्स आणि हॅट्स, रिमझिम पावसापासून बचावासाठी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. 

     स्टायलिश रेन बॅग्स, बॅग कव्हर्स, मोबाईल पाऊच सध्या खास डिमांडमध्ये आहेत.
तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार यामधल्या कुठल्याही ॲक्सेसरीज तुमच्या पावसाळी शॉपिंग लिस्टमध्ये ॲड करा, जेणेकरून पावसाळ्यातही स्वतःला स्टायलिश कॅरी करता येईल. पण याबरोबरच बाहेर जाताना मास्क आणि हँड ग्लोव्ह्ज घालायला विसरू नका. 

संबंधित बातम्या