स्टाइल में रहने का...

सोनिया उपासनी
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

स्टाइल स्टेटमेंट
सध्याचे फॅशनमधले हॉट ट्रेंड्स... क्लोदिंग आणि ज्वेलरीमध्ये आलेले नवनवीन प्रकार... 
याविषयी जाणून घेऊया!
सोनिया उपासनी

थोडे ऊन, थोडा पाऊस, सकाळ व सायंकाळचा ओला गारठा व त्यात आलेले लॉकडाउन ब्लूज् यावर उपाय म्हणून मूड फ्रेश करायला इतर काही गोष्टींबरोबर दैनंदिन पेहरावात थोडाफार फेरबदल केला, तर मनातल्या उदासीनतेला झटपट दूर घालवता येईल.

ढगाळ, कंटाळवाण्या वातावरणामध्ये अचानक ऊन पडून इंद्रधनुष्य आले की मन कसे प्रसन्न होते. त्याचबरोबर दिवसाची सुरुवात ॲप्रोप्रिएट ड्रेसिंगने केली तर सगळा दिवस आपोआपच उत्साही आणि आनंदी जातो. महागडे आऊटफिट असले तरच आपण छान दिसतो, हा समज चुकीचा आहे. पेहरावात अगदी छोटे छोटे फेरबदल करूनसुद्धा ट्रेंडी आणि टिपटॉप दिसता येते. 

ब्राइट आणि निऑन कलर्स, फ्लोरल प्रिंट्स, बोल्ड जिऑमेट्रिक प्रिंट्स, सदाबहार पोल्का डॉट्स, प्लेन पेस्टल शेड्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. 

स्वेटशर्ट्स व जॅकेट्स, जे पूर्वी फक्त थंड वातावरणात व हिवाळ्यातच वापरले जायचे, ते सध्या टँक टॉप्स, क्रॉप टॉप्स, ब्रालेट्स यांवर टीमअप करून एक कूल ट्रेंडसेटर ठरले आहेत. ब्राइट आणि पेस्टल शेड्समधले स्मॉकिंगचे टॉप्स आणि ट्यूब टॉप्सनेही बाजारपेठा सजल्या आहेत.

ऑफ शोल्डर ड्रेसेस, मोठ्या फ्लेअर्ड स्लीव्ह्ज, वाइड कॉलर, हाय वेस्ट वाइड बॉटम नी लेंथ पॅँट्स, हाय वेस्ट जिन्स, फ्लोरल जॅकेट्स, हाय वेस्ट पेन्सिल स्कर्ट्‌स, बोट नेक टॉप्स आणि ड्रेसेस, लीनन आउटफिट्स हे सर्व कॉर्पोरेट लूकसाठी परफेक्ट चॉईस आहेत.

पेस्टल शेड्स व क्रिस्टल ज्वेलरी, निऑन शेड्स व डल टोन ज्वेलरी, ब्राइट ह्युजवर सिल्व्हर टोन ज्वेलरी, लिनन्सवर मिनाकारी व फ्लोरल डिझाईन असलेली ज्वेलरी उठून दिसते.

इंडोवेस्टर्न व इंडियन ट्रॅडिशनल आउटफिट्समध्ये हाय स्लीट कुर्तीबरोबर वाइड अथवा नॅरो बॉटम पँट, एथनिक लाँग स्कर्ट विथ ऑफ शोल्डर क्रॉप टॉप, वाइड बॉटम पँट अथवा शरारावर लाँग अँकल लेंथ जॅकेट स्टाइल कुर्ता सध्या ट्रेंडमध्ये आहे. सिल्व्हर व गोल्डन ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी, डॅँगलिंग इअरिंग, आऊटफिटला साजेसे ब्रेसलेट या पेहरावावर उठून दिसते. 

प्रत्येक आऊटफिटसाठी मॅचिंग व कॉन्ट्रास्ट फूटवेअरपण प्रचंड प्रमाणावर चलनात आहेत. वेजेस, फ्लॅट्स फूटवेअर, मोजडी, सँडल्स हे लाँग ड्रेस घातला असेल तर उठून दिसतात. शॉर्ट ड्रेसेसबरोबर स्निकर्स, नी लेंथ बूट्स, हिल्स, स्पोर्ट शूज छान दिसतात.

ट्रेंडी लाइट वेट सिन्थेटिक व प्युअर कॉटन हँडबॅग्ज व स्लिंग बॅग्ज आणि क्लचेस कायमच फॅशनमध्ये असतात.

 लास्ट बट नॉट द लिस्ट, प्युअर कॉटनचे ट्रेंडी टू प्लाय अथवा थ्री प्लाय मास्क तुमच्या आऊटफिटबरोबर परफेक्ट अथवा कॉन्ट्रास्ट मॅच केले, की तुमचा फॉर्मल, आऊटिंग, फंक्शनल, अथवा कॅज्युअल लूक पूर्ण होतो. आणि आता मास्क हा आपल्या जीवनाचा एक भाग झालाय हे विसरून कसे चालेल. विथ ऑल द ऑड्स अराऊंड, शेवटी चलती का नाम जिंदगी....!

संबंधित बातम्या