ग्ली द ‘फेमस’ कॅट

इरावती बारसोडे
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

ट्रेंडिंग

टर्कीमधल्या इस्तंबूल येथे असलेली जगप्रसिद्ध हाजिया सोफिया ही वास्तू पर्यटनाचे लोकप्रिय स्थळ आहे. हाजिया सोफिया संग्रहालयाचे मशिदीमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय नुकताच झाला. त्यामुळे तिथे राहणाऱ्या एका मांजराचे काय, असा प्रश्‍न नेटिझन्सना पडला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. हे मांजर इन्स्टा(इन्स्टाग्राम)-फेमस आहे आणि जगभरात तिचे चाहते आहेत. ‘ग्ली द कॅट’ असे तिचे नाव आहे.

हाजिया सोफिया हे युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ आहे. हाजिया सोफिया संग्रहालयाची आता मशीद होणार असल्यामुळे आता ग्लीचे काय होणार, तिला इथे राहता येणार की नाही, असे चिंता नेटिझन्सना वाटू लागली. सोशल मीडियावर तर हा प्रश्‍न उपस्थित केला गेलाच. पण त्याशिवाय तिथल्या स्थानिक मीडियानेही याची दखल घेतली. ‘या वास्तूचे मशिदीमध्ये रूपांतर होणार असले, तरी ग्ली काय किंवा इतर मांजरांनाही इथून जायची गरज नाही. हेच त्यांचे घर आहे,’ असे संबंधित अधिकाऱ्यांनी राउटर्सशी बोलताना स्पष्ट केले आहे. यानंतर ग्ली इथे राहू शकते, अशा आशयाच्या बातम्याही आल्या. तशी ग्ली एरवीही फेमस आहेच, पण तिच्या घराचा प्रश्न उद्‍भवल्यामुळे ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली.

हिरव्यागार डोळ्यांची ही गुबगुबीत राखाडी मांजर इन्स्टाग्रामवर भलतीच फेमस आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामादेखील तिचे फॅन आहेत. त्यांचेही ग्लीबरोबर काढलेले फोटो आहेत. ग्लीचे Hagiasofiacat या नावाने स्वतःचे इन्स्टाग्राम अकाउंट आहे. या अकाउंटला ६८ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. टर्किश गाइड युमट बाचेसी यांनी चार वर्षांपूर्वी ग्लीचे इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केले होते. ‘My land is HagiaSofia. I’m a celebrity cat. They call me union of love,’ असे वर्णन अकाउंटच्या बायोमध्ये लिहिले आहे. या अकाउंटवर ग्लीचे शेकडो फोटो आहेत आणि त्यातील बरेचसे पर्यटकांनी टॅग केलेले आहेत. हाजिया सोफियाला भेट देणारा जवळपास प्रत्येकजण ग्लीबरोबर फोटो काढतोच आणि ग्लीसुद्धा फोटोसाठी पोज देते. ग्लीबरोबर काढलेले पर्यटकांचे अनेक सेल्फी पर्यटकांनी पोस्ट केले आहेत. तसेच कधी झोपलेली, कधी रागावून बघणारी, कधी जांभाई देणारी, कधी आळस देणारी... अशा वेगवेगळ्या मूड्स मधले असंख्य फोटो ग्लीच्या इन्स्टा अकाउंटवर बघायला मिळतील. प्रत्येक फोटोला छानसे कॅप्शनही आहे. ग्लीच्या लेटेस्ट फोटोखालीही एक कॅप्शन आहे. ज्यामध्ये म्हटले आहे, की मांजरावर प्रेम करण्याचे फायदेही आहेत. संशोधकांच्या मते मांजरावर प्रेम करणाऱ्या माणसाचे आयुष्य निरोगी राहते. त्यांना हृदयविकाराचा झटका येत नाही. त्यामुळे तुमचा मूड कसाही असला, तरी माझा विचार करा आणि आनंदी राहा.

या अकाउंटच्या जन्मामागची कहाणी सांगताना बाचेसी सांगतात, की मी जेव्हा जेव्हा हाजिया सोफियाला जायचे, तेव्हा ही मांजर एखाद्या मॉडेलसारखी पर्यटकांना फोटोसाठी पोज देताना दिसायची. ग्ली आम्ही तुला भेटायला इस्तंबूलला येऊ, असे मेसेजेस ग्लीच्या इन्स्टा अकाउंटवर येतात, असेही त्यांनी सांगितले.

ग्लीच्या इन्स्टा इकाउंटच्या बायोमध्ये म्हटल्याप्रमाणे ग्लीचा अर्थ खरोखरच ‘युनियन ऑफ लव्ह’ असा होतो. तिचा जन्म हाजिया सोफियामध्येच झाला. हाजिया सोफियामध्ये त्यावेळी रिस्टोरर म्हणून काम करणाऱ्या बिल्जेन दव्हेची यांनी तिचे नाव ग्री (इंग्रजीतील ग्रेचा शॉर्टफॉर्म) ठेवले होते. पण नंतर तिच्या क्युटनेसमुळे आणि डोळ्यांमधील तिरळेपणामुळे तिचे नाव ग्ली झाले, अशी माहिती हाजिया सोफियाच्या वेबसाइटवर वाचायला मिळते. 

पत्रलेखन म्हणजे दोन व्यक्तींमधल्या संवादाचं माध्यम. पत्रसंवादाचा हा सिलसिला अनेकदा बराच काळ चालत राहून उत्तरोत्तर रंगत जातो. साहित्याच्या दुनियेत तर पत्रलेखनाचं एक वेगळंच महत्त्व आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमधील व्यक्तींची पत्रं जशी त्यांच्या स्वभावावर, परस्परसंबंधांवर प्रकाश टाकतात, तशीच ती त्या त्या काळाचा आरसाही बनून येतात. ग़ालिबच्या पत्रांबाबत हेच म्हणता येईल. 

संबंधित बातम्या