मीम्सची इनिंग

इरावती बारसोडे
सोमवार, 28 डिसेंबर 2020

ट्रेंडिंग

गेल्या शुक्रवारी आपण ऑस्ट्रेलिया विरुद्धचा टेस्ट क्रिकेट सामना खूप वाईट पद्धतीने हरलो. खरेतर टीम इंडियाकडे ५३ धावांची आघाडी होती. पण सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे अख्खा संघ तंबूत परतला. आता हे कसे घडले याचे दुःख पुन्हा उगाळण्यात काही हशील होणार नाही. या ‘झटपट’ इनिंगनंतर सोशल मीडियावर मात्र मीम्सची इनिंग सुरू झाली. सोशल मीडियावर भरपूर मीम्स व्हायरल झाले होते... चेष्टा करणारे, दुःख व्यक्त करणारे आणि रवी शास्त्रींना घरी पाठवा अशी मागणी करणारेही! #IndvsAusTest आणि #IndiavsAustrelia हे दोन्ही हॅशटॅग त्या दिवशी ट्रेंडमध्ये होते.

डाव घोषित केल्यामुळे नीचांकी धावसंख्येचा विक्रम अधिकृतरीत्या आपल्या नावावर झाला नसला तरी ही टीम इंडियाची आत्तापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या होती. त्यामुळेच ‘आज कुछ तुफानी करने का मतलब नया लोवेस्ट स्कोअर नही था,’ अशा आशयाचे ट्विट्स अनेकांनी केले होते. ‘४९२०४०८४०४१.. नाही, हा माझा फोन नंबर नाहीये, ही भारतीय खेळाडूंची धावसंख्या आहे,’ अशा अर्थाचेही बरेच ट्विट्स पाहायला मिळत होते. विरेंद्र सेहवागनेही ‘The OTP to forget this is 49204084041,’ असे ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘३६ धावा... सुनील गावस्करांनी ६० ओव्हरमध्ये काढल्या होत्या. युवराज सिंगने ६ चेंडूंमध्ये काढल्या होत्या आणि आता टीम इंडियाने एका इनिंगमध्ये काढल्या... याला म्हणतात इव्होल्युशन.’ असेही ट्विट एका युजरने केले होते. 

भारताची दुसरी इनिंग सुरू झाल्या झाल्या संपली. त्यामुळे भारताची दुसरी इनिंग म्हणजे, ‘भाई ये तो शुरू होते ही खतम हो गया,’ अशी होती. हे मीम अनेकांनी ट्विट केले होते. 

‘मी स्कोअर पाहिला तेव्हा भारत ९-१ वर खेळत होता. ब्रशवर पेस्ट लावायला गेलो तेवढ्यात ३६-९ स्कोअर झाला होता... what a great collapse.’ असेही एकाने ट्विट केले होते. तर, टीम इंडियाच्या लागोपाठ पडणाऱ्या विकेट्स बघून प्रत्येक भारतीय आता म्हणतोय, ‘ये सूर्यास्त क्यों नही हो रहा है?’ असेही मीम पाहायला मिळत होते. 

भारतीय संघाला बहुतेक खेळायचेच नव्हते असे म्हणून भारतीय बॅट्समेन ऑस्टेलियन बॉलर्सना विनंती करतायत, ‘लवकर बॉल टाक, पॅव्हेलियनमध्ये परत जायचंय’ आणि ‘सरेंडर करने आये है।’ हे मीम्सदेखील व्हायरल झाले होते. एकंदरीत खेळ बघता, सामना लाइव्ह चालला आहे की हायलाइट्स दाखवत आहेत, हेच कळत नाहीये.’ असेही एकाने म्हटले होते. इंडियन टीम म्हणतेय, ‘तू सही केहती थी माँ। अपना घर अपना ही होता है।’ असेही काही मीम्स होते. 

टीम इंडिया ज्या पद्धतीने हरली, त्यानंतर टीमच्या प्रशिक्षकावर टीका होणे स्वाभाविकच होते. त्यामुळेच रवी शास्त्रीही अनेक मीम्सचे टार्गेट झाले. त्याचप्रमाणे आता रवी शास्त्रीला काढून राहुल द्रविडला कोच केले पाहिजे अशी मागणीही होत होती. 

संबंधित बातम्या