रेनी बॅग्ज 

समृद्धी धायगुडे
मंगळवार, 17 जुलै 2018

ट्रेंड्‌स
 

धो-धो पावसात छत्री किंवा रेनकोट काहीही घेतले, तरी आपण भिजतोच. आपल्या बरोबर असलेल्या महत्त्वाच्या वस्तू भिजणार नाहीत, याची काळजी घेण्यासाठी ज्यात पाणी जाणार नाही अशी बॅग गरजेची असते. यावर्षी बाजारात अशा स्वरूपाच्या काही बॅग्ज आल्या आहेत. या बॅगवर पाणी टिकणार सुद्धा नाही.  या बॅग्ज अतिशय आकर्षक रंग आणि आकारात उपलब्ध आहेत. या रेनी बॅग्जच्या ट्रेंडविषयी...

     यंदा प्लास्टिक बंदीमुळे बऱ्याच ॲक्‍सेसरीजची संख्या कमी किंवा त्याचे स्वरूप बदलत आहे. रेनी बॅकपॅक, सॅक, जेली, सिलिकॉन बॅग, हॉलोग्राफिक बॅग अशा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये मिळतात. बॅकपॅकमध्ये कॅनवास बॅकपॅक नेहमीच ट्रेंडी ठरतात. त्यांवरील गॉथिक प्रिंट, तिबेटियन प्रिंट या प्रकारांना नेहमीच मागणी असते. पण पावसाळ्यात त्या वापरता येत नाहीत. 

     पावसाळ्यात पारदर्शी बॅकपॅक हा उत्तम पर्याय ठरतो. या पारदर्शी बॅकपॅकमध्ये गुलाबी, निळा, हिरवा, लाल, काळा, पांढरे असे रंग येतात. यामध्ये फ्लॉवर्स प्रिंट, गॉथिक डिझाईन्स उपलब्ध आहे. या रेनी बॅकपॅकला दोन चार कप्पे असल्याने सामान व्यवस्थित मावते. शिवाय त्यातल्या गोष्टी दिसत असल्याने कुल लुक मिळतो. 

     महाविद्यालयीन तरुणांमध्ये या बॅकपॅकची प्रचंड क्रेझ आहे. ही बॅग साधारण  रुपयांपासून मिळते. यातील कॉइन बॅग इयरफोन, सुटते पैसे, चाव्या ठेवण्यासाठी या कॉइन बॅगचा वापर होऊ शकतो. स्मायली, कार्टून्स, ॲनिमल प्रिंट, पॉप आर्ट डिझाइन्समुळे या कॉइन बॅग एकदम हटके दिसतात. 

     या बॅगमध्ये हार्ट शेपपासून कार्टून शेप मध्ये मिळतात. जेली पॉप कलर्समुळे विशेष भाव खातात. ही कॉइन बॅग ३० ते ८० रुपयांच्या रेंजमध्ये मिळतात. आपल्या पर्समधील पैसे, पास, कार्ड ठेवण्यासाठी नेहमीच अशा छोट्या बॅग्जची गरज असते. ज्यात पाणी जाणार नाही, वजनाला हलक्‍या असतात. यंदा सिलिकॉन क्‍लच हा उत्तम पर्याय ठरतो. या क्‍लचमध्ये वेगळी डिझाईन्स, निऑन कलर्स भरपूर आकर्षक रंगात हे क्‍लच उपलब्ध आहेत. १०० ते ५०० रुपयांपर्यंत मिळतात. 

     फोन आणि चष्मा या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या. त्यांना पाण्यापासून लांब ठेवण्यासाठी सध्या बाजारात सिलिकॉनच्या अप्रतिम केस आल्या आहेत. या बॅग वॉटरप्रूफ असल्याने त्याची खूप मागणी आहे. यातसुद्धा जेली कलर्स आणि पॉप आर्ट डिझाइन्समुळे या बॅग्सची क्रेग वाढली आहे. साधारण २०० रुपयांपासून या केस बॅग मिळतात.

     सिलिकॉन टोट बॅग मोठ्या आकारात असलेल्या या टोट बॅगमध्ये सर्व सामान मावते. सिलिकॉन जेली मटेरिअल असल्यामुळे आणि वजनाने हलक्‍या अशा या बॅग खूप हटके आहेत. निऑन रंग आणि बो, बटन, क्‍लासी लॉक अशा डिझाइन्ससोबत टोट बॅगला प्रचंड मागणी आहे. कॉस्मेटिक बॅग, छत्री, डबा, फाइल्स या सगळ्या गोष्टी या बॅगमध्ये राहू शकतात. त्यामुळे वापरायला सोईस्कर अशा या बॅग पावसाळ्यात तुम्हाला भरपूर उपयोगी ठरतील. या साधारण ३०० रुपयांपासून आहेत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या