खादीचा 'रेट्रो लुक'

समृद्धी धायगुडे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

ट्रेंड्‌स
 

तुम्ही खादी कापडाचे चाहते असाल, तर वेगवेगळ्या रंगांचे खादी कापड वापरून आपल्या आवडीनुसार जॅकेट्‌स, स्कर्ट, लाँग वनपीस ट्राय करू शकता. खादी कपड्यांनी तुम्हाला आणि तुमच्या वॉर्डरोबला एक आगळावेगळा रुबाब येतो.

कलरफुल जॅकेट्‌स
खादीचे शिवलेले जॅकेट कोणत्याही पेहरावावर उठून दिसतात. ही जॅकेट्‌स तुम्हाला एक वेगळाच लुक देण्यास मदत करतात. या जॅकेट्‌सचे फिटिंग आणि कम्फर्ट खूपच सुंदर असतो. तरुण-तरुणींमध्ये बंद गळ्याच्या आणि बटणाची फॅशन हीट आहे. ही जॅकेट्‌स स्लिव्हलेस असून त्याची उंची आपल्याला हवी तेवढी ठेवता येते. या जॅकेट्‌ससाठी फॅब्रिक निवडताना आपल्या शरीराचा बांधा कसा आहे हे बघून निवडावा.

स्टायलिश व ट्रेंडी
खादीमध्ये पूर्वी फारसे रंग उपलब्ध नव्हते, पण सध्या विविध रंगात खादीचे फॅब्रिक्‍स उपलब्ध होते. तुम्ही आवडीनुसार मोनोक्रोम्स किंवा मल्टीकलर स्टाईलमध्ये निवडू शकता. ट्रायबल आर्टची निवडदेखील तुम्ही यामध्ये करू शकता. कशिदाकारा, शिल्पाकारी, एडऑन असे परिधान केल्यास तुमच्या पेहरावाचे सौंदर्य आणखी खुलते. मॉडर्न कट आणि पेहरावाचे फिनिशिंग सुंदर शिवण तुमचे सौंदर्य आणखी खुलवते.

आजकाल खादी केवळ कुर्ता किंवा पायजमापुरती मर्यादित राहिलेली नाही. खादीचे शर्ट, ट्यूनिक, ट्राऊझर्स, वेस्टर्न टॉप, स्कर्ट, ब्लेजर सध्या बाजारात मिळतात. यापैकी तुमच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असा पेहराव निवडू शकता. खादीमध्ये केवळ कपडेच उपलब्ध नाहीत. तर खादीपासून केलेल्या विविध ॲक्‍सेसरीजदेखील उपलब्ध आहेत. 

खादीच्या पेहरावावर घेण्यासाठी बॅग्ज, पादत्राणे आणि कापडी गळ्यातीलदेखील उपलब्ध आहेत. सरकारी खादी भांडारात किंवा खास खादीच्या ब्रॅण्डच्या दुकानात पेहराव आणि ॲक्‍सेसरीज मिळतील. या ॲक्‍सेसरीज तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. 

खादीमध्ये पूर्वी केवळ सुती कपडे येत असे, परंतु जसजसे सेलिब्रेटी या पेहरावात दिसू लागले तशी ही फॅशन परत ट्रेडमध्ये येऊ लागली. खादीमध्ये सध्या बरेच फॅशन डिझायनर विविध फॅब्रिक्‍सचे प्रयोग करत असून ते तरुणांच्या पसंतीस उतरत आहेत.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या