फॅशनेबल ब्रेसलेट

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

ट्रेंड्‌स
 

फॅशनेबल ॲक्‍सेसरीजचा महत्त्वाचा भाग असलेल्या ब्रेसलेटमध्ये सध्या प्रचंड व्हरायटी पाहायला मिळते. अर्थातच ही फॅशन नेहमी बदलणारी असते. प्रत्येक पेहरावाला साजेशा अशा ॲक्‍सेसरीज हव्याच असल्यास यामध्ये ब्रेसलेट उठून दिसते. यापैकी महत्त्वाचा भाग असलेल्या ब्रेसलेटचे रोज नवनवीन प्रकार बाजारात आलेले दिसतात. याविषयी...

अस्सल खडे, मोती असलेले ब्रेसलेट पार्टीवेअरवर शोभून दिसतात. ऑफिसमध्ये एखाद्या पार्टीच्यावेळी ब्रेसलेट घातल्यास तुमच्या फॉर्मल ड्रेसचा लुक तुम्हाला हवा तसा तुम्ही बदलू शकतो. तरुण स्त्रिया तर डोळे झाकून पार्टी किंवा नृत्य कार्यक्रमांसाठी हे ब्रेसलेट घालू शकतात. हे करताना बॅंगल ब्रेसलेटला लावलेल्या खड्यांचे रंग पोशाखाला मिळतेजुळते असावे.

लाकडी ब्रेसलेट
लाकडाच्या वेगवेगळ्या आकर्षक कोरून केलेल्या डिझाईनचे बॅंगल ब्रेसलेटने आपण कॅज्युअल लुक मिळवू शकता. लाकडाचे बॅंगल ब्रेसलेट ऑफिसमध्ये जाताना फॉर्मल पेहरावासोबत उठून दिसते. मात्र ऑफिसच्या कार्यक्रमाला जाताना मात्र हे ब्रेसलेट घालणे टाळावे.

लेदर बॅंगल ब्रेसलेट
लेदर बॅंगल ब्रेसलेट घातल्यास खास असा बोहेमियन लुक मिळेल. महाविद्यालयीन तरुणींपासून ते नोकरदार महिलांपर्यंत सुट्टीच्या दिवशी फिरायला जाताना वापरायला लेदर ब्रेसलेट घातल्यास छान दिसते. लेदर बॅंगल ब्रेसलेट मणी लावलेल्या बांगड्यांबरोबर किंवा सोनेरी पॉलिश असलेल्या बांगड्यांबरोबर वापरता येते. यामुळे थोडा वेगळा लुक मिळतो. लेदरची क्‍लिष्ट कलाकुसर दिसावी यासाठी साध्या मेटलच्या बांगड्यांसोबत या ब्रेसलेटची निवड योग्य ठरेल.

अँटिक बॅंगल ब्रेसलेट 
अँटिक बॅंगल ब्रेसलेट हे आपल्याला थोडे जुन्या काळाची आठवण करून देणारे आहे. अँटिक बॅंगल ब्रेसलेट विविध धातूंमध्ये मिळते. प्लास्टिक, लाकडी आणि लेदर या ब्रेसलेटच्या तुलनेत मेटल आणि स्फटिक यांचे ब्रेसलेट अधिक चांगले दिसते. अर्थातच व्हिन्टेज प्रकारातील ब्रेसलेट वापरताना अधिक काळजी घ्यावी लागेल. कारण ते नाजूक असल्याने तुटण्याची शक्‍यता असते. एखाद्या कार्यक्रमात जास्त धावपळ करायची असेल तर तिथे या प्रकारातील बांगड्या वापरू नये.

पारंपरिक बॅंगल ब्रेसलेट
भारतातल्या विविध संस्कृती नांदत असल्याने एखाद्या स्थानिक ठिकाणाचे वैशिष्ट्य जपणारे, आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले बॅंगल ब्रेसलेट हे वापरणे वैशिष्ट्यपूर्ण ठरते. अशा प्रकारची ब्रेसलेट साध्या पोशाखावरही खुलून दिसते.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या