धोती पॅंट्‌स 

समृद्धी धायगुडे
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

ट्रेंड्‌स
सध्या फेस्टिव्ह मूड असल्याने ट्रॅडिशनल पेहराव करण्याकडे तरुणींचा कल असतो. यामध्ये थोडा वेस्टर्न टचदेखील दिला जातो. यातूनच धोती पॅंट्‌सचा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणात दिसतो. तुम्ही जर फॅशन फॉलोअर असाल तर या स्टाइलचा नक्की विचार करावा.

     धोती पॅंट्‌सची फॅशन आली त्यावेळी त्या केवळ वेस्टर्न किंवा पूर्णपणे पारंपरिक अशा स्वरूपातच उपलब्ध होत्या. पण सध्या लुक हटके ठेवण्याच्या दृष्टीने या दोन्हींचे कॉम्बिनेशन करून नवे रूप बाजारात आले आहे.

     यूनिकमध्ये सर्वांत बेस्ट ऑप्शन आहे इंडो वेस्टर्न आउटफिट्‌स. सध्या या आउटफिट्‌समध्ये सर्वांत ट्रेंडमध्ये आहे धोती-सलवार.
        वेगवेगळ्या फेस्टिव्हलच्या निमित्ताने बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील धोती- सलवारला पसंती दिली आहे. यांत तब्बू, परिणती चोप्रा, तापसी पन्नू, सोनम कपूर, शिल्पा शेट्टी, आलिया भट, नवोदित अभिनेत्री जान्हवी कपूर, क्रिती सनन यांचा समावेश होतो. 

     धोती तुम्ही तुमच्या आवडीनुसार, लॉन्ग किंवा शॉर्ट कुर्त्यांसोबत ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला ट्रॅडिशनल लुक मिळविण्यास मदत होईल. 

     क्रॉप टॉप सध्या ट्रेन्डमध्ये आहे. तुम्ही  क्रॉप टॉपबरोबर धोती-पॅंट्‌स ट्राय करू शकता. यामुळे तुम्हाला इंडो वेस्टर्न आणि फेस्टिव्ह लुक मिळण्यास मदत होईल. 

     या गणेश फेस्टिव्हलमध्ये चारचौघींमध्ये उठून दिसण्यासाठी आणि पेहरावात 
थोडा बदल हवा असल्यास क्रॉप टॉप आणि धोतीवर फ्लोअर लेन्थ जॅकेट, सेक्‍सी जॅकेट तुम्ही ट्राय करू शकता. असा पेहराव आलिया भटने एका चित्रपटात केला आहे.

     या धोती-पॅंट्‌सवर ॲक्‍सेसरीज संबंधित कार्यक्रम बघून घालाव्यात फॉर्मल असेल तर प्लेन धोती आणि टॉपवर ऑक्‍सिडाइज ज्वेलरी उठून दिसते. फेस्टिव्ह मूडसाठी हा पेहराव करताना मात्र मोजडी, जॅकेट, मोठ्या इअरिंग्ज, आवडीनुसार बिंदी लावू शकतो. मात्र या पेहरावातील जॅकेट उठावदार आणि भरीव नक्षी काम केलेले असेल, तर गळ्यातले घालण्याची गरज नाही. डीप नेक टॉप असल्यास मोठे कानातले उठून दिसतात. याशिवाय लॉन्ग जॅकेट घालणार असाल तर  हाय हिल्स सॅन्डल यावर उठून दिसतील. फॉर्मल धोती पंत असेल तर त्यावर वेजेसदेखील छान दिसतात.  

     धोती-पॅंटची फॅशन फॉलो करताना मात्र थोडी काळजी घ्यावी ती म्हणजे प्रसंग कोणत्या ठिकाणी घालून जात आहात आणि त्यावरील ॲक्‍सेसरीजची निवड महत्त्वाची ठरते. 
या सर्वांचा चांगला मेळ जमला तरच तुमचा लुक उठावदार होईल हे नेहमी लक्षात ठेवा.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या