’बॅग’वती 

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

कला आणि संस्कृती

  •      बॅगिटच्या नव्या टाय अप क्‍लोज्ड हॅण्डबॅग्ज आणि शोल्डर बॅग्ज या लेदर, डेनिम अशा विविध प्रकारात उपलब्ध आहेत. त्यामुळे पावसाळा असला, तरी लेदरसारख्या फॅब्रिकला मागणी आहे. खास करून स्लिंग बॅग्जना जास्त पसंती मिळत आहे.
  •      ड्रेसबेरी या ब्रँण्डने आकर्षक रंगांच्या बॅग्ज बाजारात आणलेल्या आहेत. ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लू बेरी या रंगाच्या बॅग्ज लक्ष वेधून घेतात. याशिवाय या ब्रँण्डच्या पॉकेट शोल्डर या प्रकारच्या बॅग्जही बाजारात उपलब्ध आहेत.
  •      टास्सेल ब्रँण्डच्या बॅग्ज प्रसिद्ध आहेत. विशेषतः मिनी हॅण्डबॅग्ज, तसेच मोठया शोल्डर बॅग्जमध्ये हा ट्रेंड दिसून 
  • येतो. ‘गुच्ची’ या ब्रॅण्डच्या बॅग्ज म्हणजे रॉयल बॅग्ज, गाऊन, मिडी स्कर्ट, 
  • जम्पसूट अशा पेहरावावर या बॅग्ज उठून दिसतील.
  •      सिंथेटिक बॅग्ज तुम्ही हमखास वापरू शकता. या बॅग्जचा लुक कॉलेज तरुणांसाठी योग्य आहे. ऑफिसला जाणाऱ्या तरुणांसाठी योग्य बॅग्ज म्हणजे टोट बॅग्ज. या बॅग्ज अगदी हलक्या व दिसायला आकर्षक असतात. या बॅग्जमध्ये तुमच्या वस्तूही सुरक्षित ठेवता येतील. 
  •      या बॅग्ज पावसाळ्यात नीट सांभाळताही येतात. टोट बॅग्जना सध्या भरपूर मागणी आहे. लेव्हीच्या बॅग्ज या लेदर, वुलमध्ये टॉट आणि बॉक्‍स बॅग्जमध्ये उपलब्ध आहेत.
  •      ‘दा मिलानो’ या ब्रॅण्डने सध्या ब्लॅक आणि डार्क ब्राऊन रंगातील बॅग्ज आणल्या आहेत. या बॅग्ज सगळ्या प्रकारच्या फॉर्मल वेअरवर उठून दिसतात. ‘चुंबक’ या ब्रॅण्डच्या बॅग्जही हटके, पण ऑथेंटिक स्टाइलमध्ये आहेत. विविध कलर व आकर्षक रंगसंगती व स्टाइलसह विविध बॅग्ज ट्राय कराव्यात. 
  •      या वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या बॅगच्या किमतीही तशाच आहेत. या सीझनमध्ये पार्टीवेअर म्हणून असलेल्या बॅग्जच्या किमती ५ ते ८ हजारापर्यंत आहेत. कॅज्युअल व नोकरदार महिलांसाठी या बॅग्ज पाचशे ते तीन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या