फेस्टिव्ह सीझन ओढणी

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

ट्रेंड्‌स
सध्या बाजारात विविध प्रकारच्या पॅटर्नचे ड्रेस आले आहेत. यामध्ये पतियाळा, घागरा, पलाझो, वेगवेगळ्या स्टाइलचे टॉप्स यांचा समावेश आहे. मात्र या सगळ्या पेहरावांना तेव्हाच शोभा येते, जेव्हा तुम्ही त्यावर ओढणी रॅप करता. या ओढणीचे महत्त्व लक्षात घेऊन बऱ्याच फॅशन डिझायनर्सनी डिझाईन केलेले दुपट्टा कलेक्‍शन सध्या बाजारात वेगवेगळ्या विक्रेत्यांकडे किंवा बुटीक्‍समध्ये उपलब्ध आहे. या नव्या आणि आकर्षक पद्धतीच्या ओढणीविषयी...

वन साईडेड स्टाइल
या दिवाळीत एथनिक वेअर्स ट्राय करताना हेवी डिझाइन्सचे दुपट्टे घेतल्यास तुमचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. महाविद्यालयीन तरुणींमध्ये वन साईडेड ओढणीची फॅशन लोकप्रिय आहे. हेवी वर्क केलेले दुपट्टे 
प्लेन ड्रेसवर परिधान करून त्याची शोभा आपण आणखी वाढवू शकतो. हा ड्रेस जर अनारकली असेल, तर तो आणखी ग्रेसफुल दिसतो.

कमरबंद ओढणी
ओढण्या कॅरी करण्याची आणखी एक ही पद्धत आहे. ही पद्धत बहुतेक मुलींना लहानपणापासून आवडते. या प्रकारात कंबरेच्या चारही बाजूने रॅप करून एका खांद्यावर अडकवली जाते. याशिवाय लेहंग्यावरही हे उठून दिसते. ओढणीचा जास्तीत जास्त भाग मागे ठेवला, तर तुम्हाला सहज वावरता येते.

नेक स्टाइल ओढणी
ओढणी अगदी गळ्याजवळ ठेवणे हा एक नावीन्यपूर्ण प्रकार आहे. हा प्रकार तुम्ही ऑफिसवेअरमध्ये ट्राय करू शकता. गळ्यात स्कार्फसारखी एक ओढणी रॅप करू शकते. हा प्रकार फॉर्मल, ब्लेजर, कुर्तीबरोबर वापरू शकतो. यामध्ये तुम्ही स्टोलचा वापर करू शकते. 

डबल दुपट्टा
तुमची ओढणी कशी रॅप करायची हे तुमच्या चेहऱ्याच्याच आकारावरून निश्‍चित करावे. तुमचा चेहरा जर गोलाकार असेल ओढणीचा व्हॉल्युम कमी असावा. जर तुमचा चेहरा उभट आणि बारीक असेल तर ओढणीचा व्हॉल्युम जास्ती ठेवल्यास छान दिसते.

     ओढणीचे विविध प्रकार निवडताना शक्‍यतो काँट्रास कलरचे आणि जर प्लेन दुपट्टा असेल तर त्याला गोंडे किंवा डिझाईन करून वापरल्यास खास दिसतात. कटवर्कचे दुपट्टे असल्यास त्याला साजेशी लेसची जोड द्यावी.. वेगळ्या प्रकारचे दुपट्टे, रफल्स ट्राय करावेत. 
     या फेस्टिव्ह सिजनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टे घेऊन पारंपरिक कपड्यांना नवा लुक देऊ शकतो. हे दुपट्टे निवडताना त्यावरील ज्वेलरी आणि इतर ॲक्‍सेसरीज आणि मुख्य म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असे निवडावेत.   

फोटो फीचर

संबंधित बातम्या