आय क्रॉप पॅन्ट्‌स

समृद्धी धायगुडे
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

ट्रेंड्‌स
बाजारात रोज नवी फॅशन येते. यापैकी आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसेल अशा कपड्यांची निवड करावी. सध्या क्रॉप पॅन्ट्‌सच्या फॅशनची चलती आहे. या क्रॉप पॅन्ट्‌स कुलॉट्‌सच्या नावानेदेखील प्रचलित आहेत. या पॅन्ट्‌सचे वैशिष्ट्य म्हणजे हा पॅन्ट्चा प्रकार सर्व उंचीच्या तरुणींना शोभून दिसतो.

  • ही पॅन्ट पहिल्यांदाच ट्राय करणार असाल, तर सर्वांत आधी अँकल लेन्थ असलेली पॅन्ट ट्राय करावी. यामुळे तुम्हाला हटके लुक मिळेल. 
  • कुलॉट्‌स तुम्ही कोणत्याही टॉपसोबत पेअर करू शकता. तुम्हाला कोणता लुक ट्राय करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर हाय वेस्ट कुलॉट्‌स ट्राय करणार असाल, तर तुम्ही स्टायलिश क्रॉप टॉप घालू शकता.
  • जर तुम्हाला लो वेस्ट आणि अँकल लेन्थ कुलॉट्‌स ट्राय करायचे असतील, तर नी-लेन्थ कुर्ती उठून दिसते. यामुळे तुम्हाला वेस्टर्न आणि एथनिक लुक मिळू शकतो. 
  • सध्या बाजारात ए लाइन स्कर्ट, क्रॉप टॉपही उपलब्ध आहेत. हे कपडे आपण स्टायलिश शर्टसोबत पेअर करू शकतो. याशिवाय ज्यूल्ड टॉप कुलॉट्‌सबरोबर उठून दिसतात. 
  • वेगवेगळ्या लेन्थ, स्टाइल आणि पॅटर्नमध्ये उपलब्ध असलेले कुलॉट्‌स दिसायला केवळ स्टायलिश नाही, तर या कपड्यांमुळे येणारा कम्फर्टदेखील छान आहे. कुलॉटसच्या कम्फर्टमुळेच हे कपडे आपण कुठेही वापरू शकतो. डे-नाइट पार्टी, आउटिंगसाठीसुद्धा हे कपडे वापरू शकतो. 
  • फॉर्मल लूकसाठी प्लेन कुलॉट्‌स आपण ऑफिस वेअर म्हणून निवडू शकतो. यावर एखादा फॉर्मल शर्ट छान दिसतो. फॉर्मल लूकसाठी तुम्ही मोनोक्रोमॅटिक कलरच्या कुलॉट्‌स वेअर करू शकता. या कुलॉटसचा फॅशन जगतातील मुक्त संचार बघून तुम्ही तुमच्या कलेक्‍शनमध्ये जरूर समाविष्ट करावा.

फोटो फीचर

संबंधित बातम्या