देखण्या भुवया

समृद्धी धायगुडे
शनिवार, 8 डिसेंबर 2018

ट्रेंड्‌स
काही दिवसांपूर्वी प्रिया वॉरियर या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये प्रियाने उडविलेल्या भुवया सर्वांच्याच लक्षात राहणाऱ्या होत्या. यावरूनच प्रत्येक तरुणीच्या आयुष्यात भुवयांना किती महत्त्व असते हे लक्षात आले असेल. सोशल मीडियावर फॅशन आणि मेकअपचे रोज नवे ट्रेंड पाहायला मिळतात. अशाच हटक्‍या आयब्रोजच्या ट्रेंडविषयी...

भुवयांचा आकार प्रमाणबद्ध असेल, तर चेहरा उठून दिसतो. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या भुवया चेहऱ्याला साजेशा दिसण्यासाठी विविध प्रयोग करून पाहात असतात. हल्ली प्रत्येक ट्रेंड हा सोशल मीडियावरून व्हायरल होता आपल्यापर्यंत पोहोचतो. प्राचीन काळी इजिप्शियन संस्कृतीतदेखील भुवया उठावदार दिसण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जायचे. 

डोळ्यांचा मेकअप करताना या सर्व बाबींचा खूप बारकाईने विचार केला जातो. पापण्या, भुवया डोळ्यांच्या मेकअपसाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. काही दिवसांपूर्वी कॅट आय स्टाइल मेकअप ट्रेंडमध्ये होता. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ट्रेंडमध्ये फिशटेल ब्रो,टेक्‍श्चर्ड, फेदर ब्रो, गार्डन ब्रो, रेनबो ब्रो असे विविध प्रकार आय ब्रोमध्ये लोकप्रिय होत आहेत.

फिशटेल ब्रो
हा प्रकार प्रत्येकालाच उठून दिसतो असे नाही. काही खास पेहराव जसे हॅलोविन डे सारख्या पेहरावावर, नाइट पार्टीला जाताना सहज करू शकता. फाउंडेशन आणि आयब्रो पेन्सिलचा थोडा वापर करून तुम्ही हा आकार भुवयांना देऊ शकता.

फेदर ब्रो
हा ट्रेंड प्रत्यक्षात लोकप्रिय नसला, तरी सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. तुम्हाला फेदर लुक मिळविण्यासाठी फेदर ज्वेलरीबरोबर या आयब्रोचा प्रकार जरूर ट्राय करावा.

गार्डन ब्रो 
मोटिफ मेकअपची सध्या फॅशन आहेच. कोणत्याही फॅशनमध्ये फुलांची नक्षी फार भाव खाऊन जाते. फुलांची नक्षी सगळीकडे सारखी नसते. ही नक्षी उठावदार दिसते. नव्वदच्या दशकात लहान मुलींना कुंकू लावताना विविध रंगांचा वापर केला जातो. त्याचाच वापर आता भुवयांचे सौंदर्य खुलविण्यासाठी होताना दिसतो.

रेनबो आयब्रो
मेकअपच्या दुनियेत विविध रंगांना नेहमीच खूप मागणी असते. त्याच उत्पादन कंपन्यांपैकी एक असलेली कॅट वॉन डी या ब्युटी ब्रॅंडने नुकतेच काही वेगन उत्पादने काढली आहेत. यामध्ये तुमच्या आयब्रोजवर इंद्रधनुष्याचा प्रभावाचा दाखवण्याची संधी मिळेल. अशा प्रकारच्या कलरफुल आयब्रोमुळे तुमची रंगांची हौसही पूर्ण होते.

टेक्‍श्चर्ड ब्रो
हा प्रकार शक्‍यतो फॉर्मल पेहरावावर करावा. हे करताना आयब्रो पेन्सिलने दाट भुवयांना आकार द्यावा. पेन्सिल वापरताना अत्यंत काळजीपूर्वक आडव्या आणि उभ्या रेषा ओढाव्या लागतात. यामुळे तुमचा चेहरा एकदम शार्प आणि आखीव रेखीव दिसतो आणि डोळे उठावदार दिसतात.

फोटो फीचर

संबंधित बातम्या