फ्युचर ट्रेंड्‌स

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 10 जानेवारी 2019

ट्रेंड्‌स
दरवर्षी विविध प्रकारचे ट्रेंड बाजारात येतात. सेलेब्रेटीजच्या लग्नांमुळे हे नवनवीन ट्रेंड प्रकाशझोतात असतात. जसे, वीरुष्काच्या लग्नात अनुष्काने घातलेला फिकट रंगाचा लेहंगा सगळीकडे चर्चेत होता. सध्या महिलांच्या पोशाखात पॉकेटची फॅशन नव्याने येत आहे. अशा जुन्या नव्या फॅशनचे कॉम्बिनेशन घेऊन काही नवे ट्रेंड यावर्षी बाजारात येणार आहेत. याविषयी...

स्लिव्हज डिटेलिंगवर भर
एलोन्गेटेड, ट्रम्पेट, रागलन आणि किमोनो हे डिझायनर आपल्या कलेक्‍शनमध्ये डिटेलिंगवर भर देणारे आहेत. लेहंग्यासोबत व्हॉल्युम स्लिव्ह्जवाल्या ब्लाऊजची फॅशन सध्या प्रसिद्ध होत आहे. यामधील विशेष बाब म्हणजे ड्रेसच्या वरच्या भागात फ्लॅब टाकून खालच्या भागात स्लिम दाखवले जाते. बेल स्लिव्ह्ज आणि बेटाव्हिन्ग स्लिव्ह्ज तुमचा ड्रेस उठावदार करते. शिवाय पार्टीला किंवा संध्याकाळच्या कार्यक्रमाला जाताना सहज घालू शकता.

पॉकेटची फॅशन
पारंपरिक फॅशनमध्ये खिसा हा बहुतेक करून केवळ पुरुषांच्या पेहरावाशीच जोडला जातो. मात्र सध्या खिसा हा महिलांच्या पेहरावातील फॅशन स्टेटमेंट झाला आहे. हे केवळ कुर्तीजमध्ये नाही तर लेहंग्यासारख्या हेवी आऊटफिट्‌समध्ये ही खिशाचा सहज समावेश होतो. हा नववधूच्या विवाह कलेक्‍शनमधील मोठा आणि क्रांतिकारी बदल आहे. या पॉकेटचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही अशा ठिकाणी हे पॉकेट्‌स डिझाईन केले जातात, यामुळे लेहंग्याच्या सौंदर्यात कोणतीही आडकाठी येत नाही.

फ्रिंज फॅशन 
फ्रिंज म्हणजे झालरसारखा ड्रेसचा एक भाग. हा ट्रेंड सत्तरच्या दशकात येऊन गेला आहे. कपडे, बॅग्ज, शूज, पॅन्ट या सर्व गोष्टींवर एका झालर दिसते. या फॅशनची इंडो वेस्टर्न लूकवरही ही फ्रिंज फॅशन उठून दिसते.  नव्या वर्षात बोहल्यावर चढताना इच्छुकांनी या फॅशनचा जरूर विचार करावा.

क्‍लेशिंग प्रिट्‌सचा ट्रेंड
फॅशन क्षेत्रात यावर्षी बेमेल आणि क्लेशिंग प्रिंट्‌स फॅशन वॉकच्या वेळी मोठ्या प्रमाणात दाखविली गेली. याशिवाय रंगांचे नियम मोडण्यासाठी यावर्षी डिझायनरने लाल रंगासोबत हिरवा, निळा, पिवळा असे रंग वापरून विविध प्रयोग केले आहेत. चेक्‍स, ॲनिमल, फ्लोरल प्रिंट यांपैकी कोणत्याही एका कपड्यांसोबत घातल्या जात नाही. मात्र वॉश विंटेज फ्लॉवर, पोलका डॉट्‌स, गिंगम यासोबत हा प्रयोग करता येणे शक्‍य आहे.

पेस्टल कलर
मिंटी ब्ल्यू आणि बेबी पिंक कलर असे फिकट रंग सध्या ऑनलाइनवर धुमाकूळ घालत आहेत. पारंपरिक कार्यक्रमात नववधूने हिरवे, लाल असे रंग वापरण्याची फॅशन खूप जुनी झाली आहे आणि सध्या तरुणी त्याला प्राधान्यही देत नाहीत. त्यामुळे या नव्या वर्षांत नववधूसह तिच्या करवल्यासुद्धा या रंगांच्या पेहरावात दिसतील. याशिवाय ओव्हर साईज कोट्‌सदेखील या कलरमध्ये उठून दिसतात.

संबंधित बातम्या